Thursday, December 26, 2024
Homeपुणेवडगावआयत्या पिठावर रेघोट्या ओढणाऱ्या विरोधकांनी खोट्या वार्ता प्रसारित करू नये..नगराध्यक्ष मयूर ढोरे..

आयत्या पिठावर रेघोट्या ओढणाऱ्या विरोधकांनी खोट्या वार्ता प्रसारित करू नये..नगराध्यक्ष मयूर ढोरे..

वडगाव मावळ दि.2: वडगाव नगरपंचांयतिच्या सहा घंटागाड्या उद्यापासून वडगावकरांच्या सेवेत रुजू होणार नगराध्यक्ष मयूर ढोरे. स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत वडगाव नगरपंचायतीने घनकचरा व्यवस्थापन निधीतून शहरातील कचरा संकलन करण्यासाठी मार्च महिन्यात सहा घंटागाड्या खरेदी केल्या होत्या त्या वाहनांचे थर्ड पार्टी ऑडीट कोरोनामुळे लांबणीवर गेल्याने ऑडीट अहवाल उशीरा प्राप्त झाला.

त्यामुळे या घंटागाड्या नागरिकांच्या सेवेत रुजू होण्याकरिता विलंब झाला असता काही कालावधीत अहवाल उत्तम आल्यानंतर घंटागाड्या मासिक भाडे करारावर देण्यासाठीचा विषय १६ जुलै रोजी जनरल मिटींगमध्ये ठेवण्यात आला व त्यावेळी घंटागाडी संबंधित ठराव प्रारित झाला.

पुढे कराराची प्रक्रिया पूर्ण होऊन एक आॉगस्ट ला घंटागाड्या घनकचरा ठेकेदार यांच्या ताब्यात देण्यात आल्या असून उदया मंगळवार दिनांक ३ ऑगस्ट पासून नगरपंचायत मधील नवीन घंटागाड्या नागरिकांच्या सेवेत रुजू होत आहेत.

त्यामुळे विरोधकांनी पूर्ण माहिती घेतल्याशिवाय आरोप प्रतिआरोप करु नयेत.तसेच विरोधकांनी नुकतेच एका प्रसार माध्यमातून खोटी बातमी प्रसारित केली असून कोणताही ठराव हा एका रात्रीत मंजूर होत नसतो वा बदलता येत नसतो याची जाणीव विरोधकांना असायला हवी आयत्या पिठावर रेघोट्या मारण्याची सवय असणाऱ्या विरोधकांनी उगाचच नगरपंचायत व शहराचे नाव बदनाम करू नये.

शासकीय कामे ही शासनाच्या नियमानुसार व वेळेतच होतात त्यावर राजकारण करू नये असा टोला मयूर ढोरे यांनी खोटी बातमी प्रसारित करणाऱ्या विरोधकांना लगावला आहे.

- Advertisment -

You cannot copy content of this page