Thursday, January 16, 2025
Homeपुणेलोणावळा"आयुष फौंडेशन " लोणावळा यांचा अनोखा उपक्रम....

“आयुष फौंडेशन ” लोणावळा यांचा अनोखा उपक्रम….

कुरुवंडे- मावळ ( कार्ला प्रतिनिधी- गणेश कुंभार मावळ प्रतिनिधी- रोषनी ठाकूर दी.31 जुलै 2020) “आयुष फौंडेशन” लोणावळा , यांच्यावतीने ग्रामपंचायत कुरवंडे यांना” Arsenic- 30″ या रोगप्रतीकारक शक्ती वाढविण्यासाठी उपयुक्त औषधांचे मोफत वाटप करण्यात आले. लोणावळा परीसरात कोरोनाच्या प्रादुर्भावा मुळे रुग्णांची संख्या वाढत आहे.

यातच कोरोना रोगापासून कसे दुर राहता येईल याची दक्षता नागरिकांनी घेने गरजेचे आहे. त्याच अनुषंगाने आयुष फौंडेशन लोणावळा यांनी हा उपक्रम राबविला आहे. या प्रसंगी आयुष फौंडेशनचे अध्यक्ष डाॅ.अमोल कालेकर,सेक्रेटरी प्रा.विकास गायकवाड, खजिनदार डाॅ.अभिजीत भगत,सौ सायली जोशी ,धिरज निकम तसेच कुरवंडे ग्रा. सरपंच – रोशन ससाने,ग्रा. कर्मचारी – जगदीश कदम,रोहीत ससाने इ. उपस्थित होते.

- Advertisment -

You cannot copy content of this page