Friday, June 14, 2024
Homeपुणेलोणावळाआय पी एस सत्यसाई कार्तिक यांची खंडाळा येथे मटका घेणाऱ्या पाच जणांवर...

आय पी एस सत्यसाई कार्तिक यांची खंडाळा येथे मटका घेणाऱ्या पाच जणांवर कारवाई..

लोणावळा (प्रतिनिधी):आय पी एस सत्यसाई कार्तिक यांची मोठी कारवाई, लोणावळ्यातील खंडाळा येथील उघड्यावर सुरु असलेल्या कल्याण मटका अड्यावर छापा मारत पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करून 1 लाख 38 हजार 790 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.याबाबत भूषण दशरथ कुवर यांनी फिर्याद दिली असून याप्रकरणी पाच जणांविरोधात गु र नं 101/2023 महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम कलम 12 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोणावळा शहर पोलीस स्टेशनच्या नवीन डि बी पथकाने काही दिवसांपूर्वी सात विविध गुन्हे उघडकीस आणून प्रशंसा मिळविली. त्याच बरोबर आज दि.15 रोजी सत्यसाई कार्तिक यांची ही कारवाई उल्लेखनीय आहे.
या कारवाईत आरोपी 1)रितेष शाम दळवी (वय 27),रा. खंडाळा बाजारपेठ ता. मावळ जि. पुणे,2) सुरेश दत्तु मानकर (वय 62) रा. कुणेनामा ता. मावळ,जि पुणे 3) युसुफ तय्यबअली शेठीया रा. समरहिल कुणेनामा, ता मावळ जि पुणे 4) मुनीर अब्दुला रहेमान बागवान (वय 52) रा. हनुमानटेकडी लोणावळा ता मावळ जि पुणे 5) लतीकेष शाम दळवी (वय 23 ) रा. खंडाळा बाजारपेठ ता. मावळ जि.पुणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार आज दि.15 रोजी दुपारी 3:00 वा.च्या दरम्यान खंङाऴा लोणावळा ता.मावळ जि पुणे गावाचे हद्दीतील तळयाचे शेजारील बाकड्यावर आरोपी हे स्वतः च्या आर्थिक फायद्यासाठी कल्याण मटका जुगार मोबाईल वरून खेळताना मिळून आले.यावेळी केलेल्या कारवाई मध्ये 1) 100000/- रू किमंतीचा आयफोन कंपनीचा 13 प्रो माॅडेल मोबाईल,2) 10000/- रू किमंतीचा सॅमसंग कंपनीचा ए 53 13 माॅडेल मोबाईल,3) 1500/-रू किमंतीचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल, 4)1500/-रू किमंतीचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल,
5) 5000/-रू विवो कंपनीचा मोबाईल,तसेच 6) 20790/-रु. ची रोख रक्कम त्यामध्ये 500,200,100,50, 20,10,दराचे नोटा व 10,05,02,01 दराच्या नोटा याप्रमाणे तब्बल 1,38790/- येणे प्रमाणे असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
वरिष्ठाच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार मयूर आबनावे हे करत आहेत.
- Advertisment -

You cannot copy content of this page