Friday, February 23, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडआरपीआय कोकण प्रदेश युवक सरचिटणीस पदी " जीवक गायकवाड " यांची नियुक्ती...

आरपीआय कोकण प्रदेश युवक सरचिटणीस पदी ” जीवक गायकवाड ” यांची नियुक्ती !

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले ) कोकण प्रदेश युवक आघाडीची महत्वपूर्ण बैठक केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री मा. ना. रामदासजी आठवले साहेब ( भारत सरकार ) यांच्या आदेशाने पनवेल – कामोठे या ठिकाणी संपन्न झाली, सदर बैठकीचे अध्यक्ष स्थान कोकण प्रदेश युवा अध्यक्ष मा.सुशांतभाई सकपाळ यांच्या अध्यक्षते खाली पार पडली . या बैठकीला कोकण प्रदेश युवा आघाडीची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली . यांत कर्जत – डिकसळ येथील जीवक गायकवाड यांची ” कोकण प्रदेश युवा सरचिटणीस ” पदी नियुक्ती करण्यात आली.

या बैठकीस रायगड जिल्हा अध्यक्ष नरेंद्रभाई गायकवाड , राज्य कार्यकारणी सदस्य सुमित मोरे , कोकणचे जेष्ठ नेते प्रकाश मोरे , राज्य कार्यकारणी सदस्य डॉ. प्रकाशराव शेंडगे सर , कोकण नेते सुदास मोरे , कर्जत तालुका अध्यक्ष हिरामण भाई गायकवाड , अलिबाग तालुका अध्यक्ष सुनील सप्रे , युवक जिल्हा अध्यक्ष प्रमोद महाडिक यांच्या उपस्थितीत कोकण प्रदेश युवक आघाडी कार्यकारणी जाहीर करण्यात आली.

यावेळी सुशांतभाई सकपाळ – कोकण प्रदेशाध्यक्ष – युवक आघाडी , जीवक गायकवाड – कोकण प्रदेश युवक सरचिटणीस , अमित कांबळे – कार्याध्यक्ष आदी निवड करून त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले . या महत्त्वपूर्ण बैठकीस रायगड , रत्नागिरी , सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) या पक्षाची कोकण विभागाची कार्यकारणी जाहीर झाली असून , मला कोकण प्रदेश युवक सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली आहे , कर्जत तालुक्यात युवकांची फळी निर्माण करून आगामी निवडणुकीत पक्षाची ताकद दाखवणार , असे मत नवनिर्वाचित कोकण प्रदेश युवक सरचिटणीस जीवक गायकवाड यांनी व्यक्त केले.
- Advertisment -

You cannot copy content of this page