Tuesday, May 30, 2023
Homeपुणेलोणावळाआर्थिक साक्षरता कार्यशाळा लोणावळा नगरपरिषद कार्यालयात संपन्न…

आर्थिक साक्षरता कार्यशाळा लोणावळा नगरपरिषद कार्यालयात संपन्न…

लोणावळा (प्रतिनिधी): लोणावळ्यात आर्थिक साक्षरता कार्यशाळा संपन्न झाली. नगरपरिषद सभागृहात भारतीय टपाल खात्यातर्फे आयोजित केलेल्या आर्थिक साक्षरता कार्यशाळेचा प्रचंड प्रमाणात महिलांनी लाभ घेतला.प्रामुख्याने या कार्यशाळेत सर्व बचतगटाच्या महिला वा मुलींनी प्रशिक्षणाचा लाभ घेतला.
यावेळी पोस्टल जनरल पुणे, भारत डाक विभागाचे रामचंद्र जायभाये, पुणे ग्रामिण विभागप्रमुख भारत डाक विभागाचे बाळकृष्ण एरंडे, लोणावळा पोस्ट ऑफिसचे पोस्ट मास्तर भारत गवळी, पुणे पश्चिम डाक विभागाचे सहाय्यक अधिक्षक गणेश वडुरकर, बिलींग ऑफिसर . देशपांडे, पुणे कार्यालयाच्या लर्निंग लिंक्स स्वाती दुधाने यांनी बचतगटाच्या महिलांना मार्गदर्शन केले.

You cannot copy content of this page