आर. टी.आय. कार्यकर्ता प्रकाश पोरवाल यांच्या विरोधात सलग दुसऱ्यांदा 420 चा गुन्हा दाखल…

0
1871
लोणावळा दि.17 : लोणावळा येथील आर टी आय कार्यकर्ते प्रकाश मिश्रीमल पोरवाल यांच्या विरोधात भा. द. वी. कलम 420,406,504,506 अन्वये जमीन फसवणुकीची वडगाव मावळ न्यायालयात सलग दुसऱ्यांदा तक्रार दाखल.

आरोपी प्रकाश पोरवाल यांच्यावर मागील महिन्यात केवरे लोणावळा येथील विधवा महिला गिता अशोक अगरवाल यांची फसवणूक केल्या प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल आहे त्याचा तपास सुरु असताना तुंग मावळ येथील जमिन गट नं.234/1 व जुना गट नं.234 ही मिळकत ही पर्ल हर्मन डिमेलो उर्फ पर्ल राहुल पांचाळ यांच्या मालकीची असून आरोपी प्रकाश पोरवाल यांनी तक्रारदार यांचा अज्ञान असल्याचा उल्लेख करून मुखत्यारनामा निष्पादीत केला व परस्पर खरेदी खत केले त्याचा तक्रारदार यांना कोणताही मोबदला मिळाला नाही.

त्या वेळी तक्रारदार या संज्ञान होत्या तरीही अज्ञान असा दस्तऐवज मध्ये उल्लेख करून आरोपीने खोटा दस्तऐवज तयार केला व तक्रारदार यांना धमकावले या प्रकाराबाबत तक्रारदार यांनी लोणावळा पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल केली होती मात्र पोलिसांनी अद्याप कारवाई केली नसल्यामुळे तक्रारदार यांनी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी वडगाव मावळ यांच्या न्यायालयात तक्रार दाखल केली आहे.

सदर गुन्ह्याचा प्रकार दखलपात्र असून सदर प्रकरणाचा फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 156 ( 3 ) अन्वये सखोल तपास करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी वडगाव मावळ यांनी लोणावळा शहर पोलीस ठाण्याला दिले आहेत. त्यानुसार सदर तपास लवकरात लवकर करून तक्रारदारांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी तक्रारदारांकडून करण्यात येत आहे.

त्यामुळे आरोपींने अशा प्रकारे केलेले इतर अनेक फसवणुकीची प्रकरणे उघडकीस येण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्याच्या कृत्यामुळे वर उल्लेखित अण्णा हजारे निर्मित भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन व प्रदेश उपाध्यक्ष मा. शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटना यासारख्या सामाजिक संस्थेच्या नावास काळीमा लावण्याचे काम प्रकाश पोरवाल यांनी केलेले आहे. लोकांना न्याय मिळवून देण्याच्या नावाखाली ते स्वत:ची पोळी शेकून घेत आहेत.