Wednesday, October 16, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडआर पी आय ( आठवले ) पक्षाच्या " वर्धापन दिनास " व...

आर पी आय ( आठवले ) पक्षाच्या ” वर्धापन दिनास ” व ‘ भवन भूमिपूजनास ” मोठ्या संख्येने उपस्थित रहा – अध्यक्ष हिरामण भाई गायकवाड..

सर्वांनी एकत्रित येवून काम करण्याचे केले आवाहन…

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले ) पक्षाचा ६७ वा वर्धापन दिन ” सातारा ” येथे संपन्न होणार असुन त्या ठिकाणी तालुक्यातून जास्तीत जास्त संखेने उपस्थित रहाण्याचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना सूचना देवून कर्जत खालापूर विधान सभा मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार मा. महेंद्र शेठ थोरवे यांच्या प्रयत्नातून भारतीय घटनेचे शिल्पकार , विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भवन उभारण्यात येणार असुन त्याचे भूमिपूजन सोहळा ०६ ऑक्टोंबर २०२४ रोजी मुद्रे येथे ठीक ११ – ०० वाजता आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या शुभहस्ते व तमाम आंबेडकरी अनुयायी व बहुजन समाजाच्या उपस्थितीत संपन्न होणार असुन या ठिकाणी देखील मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन , रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कर्जत तालुका अध्यक्ष हिरामणभाई गायकवाड यांनी केले . कर्जत तालुका आर पी आय पक्षाची बैठक आयु. हिरामणभाई गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली रविवार दिनांक २९ सप्टेंबर २०२४ रोजी शेळके मंगळ कार्यालय – किरवली येथे आयोजित करण्यात आली होती , यावेळी ते बोलत होते.

या सभे अगोदर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाला कोकण प्रदेश अध्यक्ष मा. प्रकाश मोरे यांच्या हस्ते तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला युवा जिल्हाध्यक्ष मा. प्रमोदजी महाडिक यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला , तालुका महिला अध्यक्षा अलका सोनावणे यांच्या हस्ते अगरबत्ती लावून वातावरण सुगंधित करण्यात आले.

या ठिकाणी प्रमुख पाहुणे युवा जिल्हाध्यक्ष प्रमोदजी महाडिक यांनी युवां वर्गासाठी व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या कार्यकर्त्यांना मोलाचे मार्गदर्शन केले, तसेच कोकण प्रदेश अध्यक्ष मा. प्रकाशजी मोरे यांनी आठवले साहेबांच्या पँथर काळातील आठवणींना उजाळा दिला . कार्यकर्ता कसा घडला जातो यांचे उत्तम उदाहरणे देण्यात आली , आणि तालुका अध्यक्ष हिरामण भाई गायकवाड यांचे मनभरून कौतुक करून तालुक्यातील काम उत्तम रित्या चालू असुन त्यांच्या पदाच्या नेतृत्वाखाली व अधिपत्याखाली सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्र येवून काम करण्याचे ठणकावून सांगितले .
कर्जत तालुका महिला अध्यक्षा रणरागिणी अलका सोनावणे यांनी इतर कार्यकर्त्यांचा खरपून समाचार घेतला . अध्यक्ष हिरामण भाई गायकवाड यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना तालुक्यात चाललेल्या ” अलबेल ” कामाबद्दल तसेच तालुका अध्यक्ष व इतर पदाधिकारी यांना डावलून पक्षाचे फलक लावणाऱ्या कार्यकर्त्यांचा चांगलाच खरपुस समाचार घेवून सर्वांनी एकत्रित येवून काम करण्याचे आवाहन केले . यावेळी कर्जत मधील ज्येष्ठ पत्रकार प्रेमनाथ जाधव यांची कोकण प्रदेश अध्यक्ष प्रकाश मोरे तसेच युवा रायगड जिल्हा अध्यक्ष प्रमोद महाडीक , अध्यक्ष हिरामण भाई गायकवाड यांच्या हस्ते कर्जत तालुका प्रवक्ते पद देण्यात आले , तर नेरळ शहर कार्याध्यक्ष पदी हरिश्चंद्र सदावर्ते यांची पद नियुक्ती करण्यात आली. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या ” गाव तिथे शाखा ” खोलण्यात येणार असल्याचा संकल्प या बैठकीत करण्यात आला.

अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात हि बैठक अतिशय शांत पणे यशस्वी पार पडली . सर्व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत व विशेष आभार व्यक्त करण्यात आले . यावेळी उपस्थित तालुका संपर्क प्रमुख किशोर गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील सर्व पदाधिकारी यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष असे मोलाचे सहकार्य केले . त्याच प्रमाणे कार्यक्रमाची प्रस्तावना तालुका सचिव अशोक गायकवाड यांनी मांडली . सदर कार्यक्रमाला कर्जत तालुक्यातून २०० ते २५० पदाधिकारी , कार्यकर्ते व महिला वर्ग उपस्थित होते.
- Advertisment -

You cannot copy content of this page