Sunday, June 23, 2024
Homeपुणेलोणावळाआर पी आय च्या वतीने लोणावळ्यात भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन…

आर पी आय च्या वतीने लोणावळ्यात भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन…

लोणावळा : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री मा.ना. रामदासजी आठवले यांच्या वाढ दिवसानिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया लोणावळा शहर “सम्यक क्रांती फाऊंडेशन लोणावळा च्या वतीने भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन 31 जानेवारी ते 4 फेब्रुवारी असे लोणावळा रेल्वे ग्राउंड येथे आर पी आय शहराध्यक्ष कमलशिल म्हस्के यांच्या वतीने करण्यात आले आहे.
या क्रिकेट स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक.१,०००००व चषक.,द्वितीय क्रमांक,५०,००० व चषक. तृतीय क्रमांक,३०,००० व चषक. चतुर्थ क्रमांक २५,००० व चषक .आणि इतर बक्षिसे. आहेत.
या स्पर्धेचे उद्घाटन आर पी आय पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी आयोजक कमलशिल आनंद म्हस्के ,गणेश गायकवाड , दिलीप दामोदरे,लक्ष्मण भालेराव, अशोक सरावते, बनसोडे,रोहिणी देसाई, सीमाताई देसाई,आनंद म्हस्के,मोहन जगताप यांसह आ र.पी.आय.मावळ तालुका व शहरातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या स्पर्धेसाठी अंपायर म्हणून अमर साठे,सलमान शेख,हे काम पाहत आहेत.समालोचन सुमित सोनवणे करत आहेत व यू ट्यूब चे कौस्तुभ पाटील (ड्रीम क्रिकेट) सह-संयोजक अनिकेत सायलेकर व सी.सी.एल.परिवार आदी सहकार्य करत आहेत.
या स्पर्धेसाठी पुणे,पिंपरी ,चिंचवड,इंदापूर, मुंबई,अलिबाग.येथून संघ (टीम) आले असल्याची माहिती आयोजक कमलशिल आनंद म्हस्के यांनी दिली.
- Advertisment -

You cannot copy content of this page