Saturday, November 2, 2024
Homeपुणेलोणावळाआर पी आय (A) च्या नवनिर्वाचित पदाधिकारी यांना नियुक्तीपत्रके प्रदान...

आर पी आय (A) च्या नवनिर्वाचित पदाधिकारी यांना नियुक्तीपत्रके प्रदान…

लोणावळा व वाकसई येथील अनेक युवक युवतींचा जाहीर प्रवेश..

लोणावळा दि.18: रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) मध्ये लोणावळा व वाकसई मधील अनेक युवा कार्यकर्ते व महिलांचा जाहीर प्रवेश.रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) चे राष्ट्रीय अध्यक्ष दिपकभाऊ निकाळजे,महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्षा सुनिता ताई चव्हाण, महाराष्ट्र प्रदेश युवक अध्यक्ष आमितभाऊ वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्हा युवक आघाडीचा कार्यक्रम झंझावात पार पडला. लोणावळा परिसर व वाकसई विभागात पुणे जिल्हा अध्यक्ष विकास दादा साळवे यांच्या प्रमुख उपस्थितीत व पुणे जिल्हा युवक अध्यक्ष अंकुश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली अनेक महिला व युवा कार्यकर्त्यांनी जाहीर प्रवेश केला.


यावेळी शिदार्थ नगर युवक विभाग प्रमुख मिलिंद जाधव,शिदार्थ नगर युवक विभाग कार्याध्यक्ष महेंद्र व्याहीलकर, रामनगर युवक विभाग प्रमुख मिलिंद सुरविर, ओळकाईवाडी युवक विभाग प्रमुखपदी राहुल मोरे, हनुमान टेकडी युवक विभाग प्रमुखपदी भरत कदम, भैरवनाथ नगर युवती विभाग प्रमुखपदी शिल्पाताई जाधव, वाकसई युवती अध्यक्षापदी कविता देसाई, वाकसई महिला कार्याध्यक्षपदी निर्मला गायकवाड, वाकसई युवती उपाध्यक्षपदी प्रियंका मोरे, वाकसई युवती संघटकपदी रेश्मा प्रितेश देसाई इत्यादी कार्यकर्त्यांनी पद ग्रहन करून वाकसई येथील अनिता मोहन देसाई, आशा विष्णू मोरे, विद्या प्रदीप मोरे,नंदीनी संजय गायकवाड,नेहा लहू जाधव, सुनिता बाळू देसाई, सोनाली सुमित देसाई इत्यादी महिलांचा जाहीर प्रवेश झाला तसेच खोंडगेवाडी येथील सचिन गायकवाड, रामनगर नगर येथील आकाश रोकडे, आगवाली चाळ येथील महेश कांबळे, ओळकाईवाडी येथील भगवान अवचर आदी कारकर्त्यांनी जाहीर प्रवेश केला आहे.


या जाहीर प्रवेश कार्यक्रमाचे आयोजन लोणावळा शहर उपाध्यक्ष कैलाश मोरे यांनी केले तर त्यांना मोलाची साथ लोणावळा शहर अध्यक्ष महेंद्र शिंदे यांनी दिली.
या वेळी वाकसई गणातील सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी यांना तालुका युवक अध्यक्ष चंद्रकांतजी ओव्हाळ यांच्या हस्ते नियुक्तीपत्रक देण्यात आली.


यावेळी किशोरजी वंजारी, युवक संघटक सचिन साळवे ,बापूजी थोरात, स्वप्निल जाधव आदी कार्यकर्त्यांनी प्रमुख उपस्थिती लाभली असून अनेक कार्यकर्त्ये /महिला भगिनी कार्यक्रमास मोठया संख्येने उपस्थित होत्या.

- Advertisment -

You cannot copy content of this page