आश्लेषा जगदिश दरवडा यांचा जोतिलिंग बहुउद्देशील संस्थेच्या वतीने सत्कार..

0
147


(प्रतिनिधी दत्तात्र शेडगे)
कर्जत तालुक्यातील शेलू बेडीज गावात राहणाऱ्या आश्लेषा जगदिश दरवडा यांना महाराष्ट्र पोलीस महासंचालकाडून पोलीस पदक देऊन सन्मानित करण्यात आले.

म्हणून त्यांच्या सत्कार जोतिलिंग सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.यावेळीं त्यांचा सत्कार करताना उधोजक गुरुनाथ शेठ मसणे (मा. सरपंच शेलु ) जोतिलिंग सामाजिक बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र पुकळे सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर भगत, ,किशोर घारे (भडवळ ग्रामपंचायत सदस्य) शिवसेना शाखा प्रमुख शेलु मंगेश तरे आदी उपस्थित होते.

राष्ट्रीय स्तरावर खेळल्या जाणाऱ्या वेटलिफ्टिंग स्पर्धेत आश्लेषा जगदिश दरवडा ह्या विजेत्या झाल्या असून त्यांना महाराष्ट्र पोलीस महासंचालकडून पोलीस पदक देऊन सन्मानित करण्यात आले आहे.