Saturday, October 19, 2024
Homeपुणेलोणावळाइंटरव्यू स्किल आणि पर्सनॅलिटी देव्हलपमेंट कोर्सचा प्रशस्तीपत्रक वितरण सोहळा उत्सहात संपन्न…

इंटरव्यू स्किल आणि पर्सनॅलिटी देव्हलपमेंट कोर्सचा प्रशस्तीपत्रक वितरण सोहळा उत्सहात संपन्न…

लोणावळा(प्रतिनिधी) :इंटरव्यू स्किल्स आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कोर्स चा सर्टिफिकेट वितरण सोहळा लोणावळ्यात संपन्न झाला.
लोणावळ्यात सलग दुसऱ्या वर्षी कौशल्य विकास प्रशिक्षण 10 एप्रिल ते 12 मे 2023 दरम्यान एक महिन्याच्या कालावधीत हे प्रशिक्षण संपन्न झाले.यामध्ये अनेक तरुणांनी लाभ घेतला.तर सहभाग घेतलेल्या सर्व प्रशिक्षनार्थीना प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले, मा. नगरसेवक दत्तात्रय येवले यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक प्रदान करण्यात आली.यावेळी वाय.सी.क्लासेस चे संचालक निवृत्ती दुडे, प्राध्यापक दीपेश गोणते आणि क्वेसीट्म अकॅडमी चे मयूर कनगुटकर उपस्थित होते.
या प्रशिक्षणाचे विशेष म्हणजे दत्तात्रय येवले ह्यांच्यातर्फे हा कोर्स ‘विनामूल्य होता. तर अकॅडमी कडून कुठलीही फी न आकारता हे प्रशिक्षण पूर्णतः मोफत दिले गेले.
प्रशस्तीपत्रक वितरण सोहळ्यात तरुणांना मार्गदर्शन करताना दत्तात्रय येवले ह्यांनी सध्याच्या स्पर्धात्मक जगात यशस्वी करियरसाठी डिग्री बरोबर संभाषण कौशल्य आणि उत्तम व्यक्तिमत्व असणे किती गरजेचे आहे ह्याचे महत्व पटवून दिले.तसेच UPSC व MPSC सारख्या स्पर्धा परीक्षेत भाग घेण्यासाठी प्रोत्साहित केले.तर निवृत्ती दुडे सरांनी देखील सर्व प्रशिक्षणार्थींचे कौतुक करत त्यांना पुढच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या आणि सतत शिकत राहून स्वतःला कौशल्यवान बनवण्याचा मौल्यवान सल्ला दिला.

त्याचबरोबर दिपेश गोणते सरांनी सर्वांशी संवाद साधताना एखाद्या विषयावर प्रभुत्व मिळवणे आणि वेळेशी हातमिळवणी करून चांगलं करियर घडवणे कस शक्य आहे ह्यावर मार्गदर्शन केले.
लोणावळ्यातील तरुणांना इंग्लिश संभाषण करताना आणि इंटरव्यू देताना अनेक कठीण परिस्थितींचा सामना करावा लागत आहे . ज्यामुळे नैराश्येला वैतागून अनेक तरुण चुकीच्या गोष्टींना बळी पडतात. त्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी फेब्रुवारी 2023 मध्ये हा कोर्स पहिल्यांदा आयोजीत केला आणि मे 2023 मध्ये पाचवी बॅच यशस्वीरित्या पूर्ण केली.आतापर्यंत शेकडो तरुणांनी ह्या कोर्स चा लाभ घेतला आहे.
ह्या कोर्स चे संपूर्ण प्रशिक्षण ब्रिटिश काउन्सिल सर्टिफाइड IELTS ट्रेनर व टाटा सर्टिफाइड स्किल डेव्हलपमेंट ट्रेनर मयूर कनगुटकर ह्यांनी दिले.
विशेष म्हणजे या वर्षी पासून प्रशिक्षणार्थीकरिता ‘एक्स्पर्ट लेक्चर’ चे देखील आयोजन केले होते.ज्यामध्ये मनशक्ती प्रयोग केंद्र लोणावळा मधून सौ.क्रांती हुक्केरीकर (C.A) यांनी एक गेस्ट लेक्चर घेऊन कठीण परिस्थितीत मन शांत कसे ठेवावे आणि निरर्थक विचार कसे टाळावे ह्यावर उत्तम मार्गदर्शन केले.
तरुणांच्या विकासाकरिता दत्तात्रय येवले ज्या प्रकारे जातीने लक्ष देत आहेत त्याकरिता मयूर कनगुटकर व निवृत्ती दुडे यांनी त्यांचे आभार मानले आणि भविष्यात सर्व एकत्र मिळून तरुणांच्या विकासाकरिता असेच कोर्सेस करत राहू असे आश्वासन दत्तात्रय येवले ह्यांनी यावेळी दिले.
क्वेसीट्म(KVESITUM) अकॅडेमी,’इंटरनॅशनल इंग्लिश लँग्वेज टेस्टिंग सिस्टम (IELTS) ह्या स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेतात ज्या परदेशात शिक्षण अथवा नोकरी करण्याकरिता अनिर्वाय आहे.हे प्रशिक्षण विध्यार्थ्यांच्या सोयीनुसार ऑनलाईन अथवा ऑफलाईन दोन्ही पद्धतीने होते.
ह्याशिवाय त्यांच्याद्वारे इंग्लिश कम्युनिकेशन स्किल्स, ऍक्सेंट न्यूट्रलाईझेशन व सॉफ्ट स्किल्स ची कोचिंग देखील दिली जाते ज्यामुळे नोकरी व व्यवसायात निश्चितच लाभ होतो.
- Advertisment -

You cannot copy content of this page