Friday, December 8, 2023
Homeमहाराष्ट्रइंदापूर पोलिसांचा गुटखा माफियाला चाप, गुटखा व ट्रक असा 49 लाखांचा मुद्देमाल...

इंदापूर पोलिसांचा गुटखा माफियाला चाप, गुटखा व ट्रक असा 49 लाखांचा मुद्देमाल जप्त…

इंदापूर दि.15 : इंदापूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक तयुब मुजावर यांच्या नेतृत्वाखाली इंदापूर पोलिसांनी लाखो रुपयांच्या गुटखा वाहतूक करणाऱ्या ट्रकवर महाराष्ट्रातील सर्वात मोठी कारवाई केली असून सदर कारवाईत तब्बल 25 लाख 75 हजार रुपये किमतीचा गुटखा व 25 लाख रुपयांचा ट्रक असा एकूण 49 लाख 75 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक मुजावर यांनी दिलेल्या माहिती नुसार आज पहाटेच्या सुमारास महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधक केलेला गुटखा वाहतूक करणारा ट्रक कर्नाटक कडून पुण्याकडे जात असताना इंदापूर पोलिसांनी लोणी देवकर येथे या संशयित ट्रकची तपासणी केली असता इंदापूर पोलिसांना ट्रक मध्ये अवैध गुटखा दिसून आला . यामध्ये इंदापूर पोलिसांनी ट्रक चालक व मालक या दोघांवरती भारतीय कलम 328 व इतर कलमानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे.

पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ . अभिनव देशमुख, बारामती विभाग अपर पोलीस अधीक्षक मिलींद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदशनाखाली इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक तयुब मुजावर , सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर धनवे , पोलीस हवालदार अमोल खैरे , पोलीस हवालदार सुनील बालगुडे , पोलीस नाईक महेंद्र पवार , पोलीस नाईक मोहम्मद अली मड्डी , पोलीस नाईक बापूसाहेब मोहिते , पोलीस नाईक सलमान खान , पोलीस नाईक जगन्नाथ कळसाईत , पोलीस कॉन्स्टेबल विशाल चौधर , लक्ष्मण सूर्यवंशी , अकबर शेख , पोलीस मित्र महादेव गोरवे , शुभम सोनवणे , हनुमंत मोटे , भाऊ कांबळे , अनिल शेवाळे यांनी सदरची धडाकेबाज कारवाई केली आहे.

पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर यांनी इंदापूर पोलीस ठाण्याचा कार्यभार सांभाळल्या पासून 4 महिन्यात 1 कोटी 60 लाखांचा गुटखा व मुद्देमाल जप्त करून गुटखा माफियांना चांगलाच चाप दिला आहे.

- Advertisment -

You cannot copy content of this page