Thursday, October 31, 2024
Homeपुणेइंदापूर पोलिसांनी धडक कारवाई करून तब्बल लाखो रुपयांचा अवैध गुटखा केला हस्तगत...

इंदापूर पोलिसांनी धडक कारवाई करून तब्बल लाखो रुपयांचा अवैध गुटखा केला हस्तगत…

इंदापूर : इंदापूर पोलिसांनी तब्बल 22 लाख 27 हजार 500 रुपये किंमतीचा अवैद्य गुटख्या सह 47,27,500 रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर यांनी इंदापूर पोलीस ठाण्याचा नुकताच कार्यभार सांभाळला असता एका महिन्यात अवैध गुटखा आयात निर्यात करणाऱ्या गुटखा माफियाच्या विरोधात एका महिन्यात ही दुसरी दमदार कामगिरी करण्यात आली आहे.

यासंदर्भात इंदापूर पोलिस ठाण्यात पोलीस शिपाई सुहास सिंकदर आरणे यांच्या फिर्यादीवरुन आरोपी हनीफ सय्यद रा. बेंगलोर व कंटेनर नंबर KA-01-AF-3396 च्या मालकाविरिध्द भादवि कलम 328, 188,279,337, 338,427,34 सह मो.वा.का.कलम 184 तसेच अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम 2006 चे कलम 26(2), 26(2)(a), 27 (3) (d), 27 (3)(e), 59 भादवि कलम 328,269,270 आधी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहिती नुसार दि. 9जानेवारी रोजी इंदापूर शहरानजीक असलेल्या पायल सर्कल जवळ आयशर कंपनीचा कंटेनर व ऊसाने भरलेला ट्रॅक्टर यांचा अपघात झाला होता. या अपघाता वेळी आयशर कंपनी च्या कंटेनरचा चालक “हनीफ सय्यद”, राहणार -बेंगलोर, हा रस्त्याने वाहन चालवताना सर्व नियमांकडे दुर्लक्ष करून वेगाने वाहन चालवत होता.त्याच्या वेगाने चालवलेल्या कंटेनर ने उसाने भरलेल्या ट्रॉलीला पाठीमाघून जोरदार धडक दिली होती. 


यामध्ये कंटेनर चालक किरकोळ जखमी झाला असतानाही गंभीर जखमी झाला आहे असा बनाव करून चालक पुढील उपचारासाठी पुणे येथे दाखल झाला होता. परंतु दोन ते तीन दिवस सदर कंटेनर कडे कोणीही न फिरकल्याने इंदापूर पोलिसांना वाहनात असलेल्या माला विषयी संशय आल्याने कंटेनरच्या पाठीमागील सील तोडून पाहिले असता यामध्ये 22 लाख 27 हजार 500 रुपये किमतीचा अवैधरीत्या गुटखा आढळून आला आहे.

त्यानुसार महाराष्ट्र शासनाने प्रतिबंध केलेला व मानवी आरोग्यास अपायकारक असलेला गुटका वाहतूक केल्याप्रकरणी इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर कारवाई पोलीस निरीक्षक टि.वाय. मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक धनवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील, पोलीस उपनिरीक्षक देठे, पोलीस उपनिरीक्षक लिगाडे,पोलीस उपनिरीक्षक पाडुळे, पोलीस उपनिरीक्षक जाधव, पोलीस नाईक सलमान खान, पोलीस हवालदार बालगुडे, पोलीस नाईक ज्ञानेश्वर जाधव, पोलीस शिपाई नरळे, पोलीस नाईक मल्हारे, पोलीस नाईक मनोज गायकवाड, पोलीस नाईक साळवे, पोलीस शिपाई केसकर, पोलीस शिपाई चौधर, पोलीस नाईक अरणे, पोलीस शिपाई शिंगाडे, पोलीस नाईक मामा चौधर, महिला पोलिस हवालदार खंडागळे यांच्या पथकाने केली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक माने करत आहेत.

- Advertisment -

You cannot copy content of this page