कोंबड्या खरेदी करण्यासाठी पिकअपमध्ये ( Maval ) ठेवलेले तीन लाख 54 हजार रुपये घेऊन बदली ड्रायव्हर पळून गेला . हे घटना सोमवार दि .23 रोजी रात्री 7 वाजता इंदोरी गावच्या हद्दीत घडली .
प्रल्हाद राजाराम म्हात्रे ( वय 42 , रा . पनवेल , जि . रायगड ) यांनी याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे . त्यानुसार चालक मुजफर किताबली मंडल याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , फिर्यादी यांचा कोंबड्या खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे . त्यांच्या पिकअप वरील ड्रायव्हर सुट्टीवर गेल्याने आरोपी मुजाफर याला बदली ड्रायव्हर म्हणून ठेवले . मुजाफर आणि क्लिनर मुखीम शब्बीर व रामा आडे असे तिघेजण मावळ तालुक्यातील इंदोरी गावच्या हद्दीत आले असताना मुजाफर याने दोन्ही क्लिनरला किराणा सामान आणण्याच्या बहाण्याने गाडीच्या खाली उतरवले.
त्यानंतर कोंबड्या खरेदीसाठी पिकअप गाडीच्या डिक्कीत ठेवलेली 3 लाख 54 हजार रुपयांची रक्कम चोरून नेली . दरम्यान पिकअप गाडी खेड तालुक्यातील येलवाडी येथे सोडून दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे . तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत .