इयत्ता 8 ते 12 वी चे वर्ग सुरु करण्याबाबत राज्य शिक्षण विभागाचा मोठा निर्णय…

0
347

कोविड 19 च्या प्रभावामुळे राज्यातील बंद असलेल्या शाळांतील इयत्ता 8 ते 12 वी चे वर्ग सुरु करण्याबाबत महाराष्ट्र राज्य शिक्षण विभागाने निर्णय घेतला आहे.त्यानुसार राज्यातील कोरोना मुक्त भागांतील शाळा सुरु करण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात 8 ते 12 वी चे वर्ग सुरु करण्यात यावेत शाळा सुरु करताना विध्यार्थ्यांना टप्प्या टप्प्याने शाळेत बोलविण्यात यावे.

त्यांना मास्कची सक्ती करण्यात यावी, शाळेत हात धुण्याची व्यवस्था करावी एखाद्या शाळेत क्वारंटाईन सेंटर असल्यास स्थानिक प्रशासनाने इतर ठिकाणे त्याचे स्थलांतर करावे आणि त्या शाळांचे निर्जंतुकीकरण करून शाळा व्यवस्थापनाकडे त्या सोपविण्यात येतील.

याची दखल घ्यावी तसेच शिक्षकांची कोविड चाचणी करण्यात यावी आणि एका बाकावर एकच विध्यार्थी बसला जाईल असे नियोजन शाळा व्यवस्थापनांनी करावी यासारख्या कोरोना संबंधित देण्यात आलेल्या अधिसूचनांचे पालन करण्यात यावे तसेच महत्वाच्या विषयांना प्राधान्य देत 8 ते 12 वी चे वर्ग सुरु करताना शासनाने दिलेल्या कार्यपद्धतीचे पालन करण्यात यावे असे आदेश महाराष्ट्र राज्य शिक्षण विभागाकडून देण्यात आले आहेत.