उधोजक गुरुनाथ मसने यांचा वाढदिवस विविध उपक्रमांची साजरा..

0
76

खोपोली- दत्तात्रय शेडगे

सेलू ग्रामपंचायतचे माजी सरपंच ,दानशूर नेते समाजसेवक आणि उधोजक गुरुनाथ मसने यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आली.जोतिलिंग सामाजिक बहुउद्देशीय संस्था मुबंई आणि शिवसृष्टी पार्क शेलू यांच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला.

यावेळी कोरोना काळात उल्लेखनीय काम करणाऱ्या डॉक्टर, नर्स, बेस्ट कर्मचारी यांचा कोरोना योद्धा म्हणून पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला त्यांना उधोजक गुरुनाथ मसने यांच्या हस्ते शाल श्रीफळ आणि सन्मान पत्र देऊन गौरविण्यात आले नंतर केक कापून गुरुनाथ मसने यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

यावेळी ज्योतिलिंग सामाजिक बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष तथा ऑल इंडिया धनगर समाज महासंघ रायगड जिल्हा अध्यक्ष रामचंद्र पुकळे ,संपर्क प्रमुख आनंदराव कचरे, खालापूर तालुका उपाध्यक्ष नारायण हिरवे, रामचंद्र शिंदे, ग्रामस्थ सदाशिव शामराव पुकळे, दीपक टेबे ,कैलास तरे, प्रकाश सुर्वे, मनोज तारे, वामन सकपाळ, दिलीप मसने आदीसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.