
मावळ दि.9: राज्याचे उपमुख्यमंत्री, आपल्या सर्वांचे लाडके नेते मा.ना.अजितदादा पवार यांच्यावर केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करुन राजकीय द्वेषापोटी होत असलेल्या कारवाई विरोधात पुणे-मुंबई द्रुतगती महामार्ग,उर्से टोलनाका येथे मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्व आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक यांच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले.
मा.अजितदादांच्या समर्थनार्थ संपुर्ण महाराष्ट्रातील जनता रस्त्यावर उतरुन पाठिंबा दर्शवत आहे. आपल्या सुसंस्कृत महाराष्ट्राला आदर्श राजकारणाची उज्ज्वल परंपरा लाभली आहे. परंतु केंद्रीय तपास यंत्रणेचा वापर राजकीय सुडबुद्धीतुन करण्याचा नवा अध्याय महाराष्ट्रातील विरोधी पक्षातील काही नेते करीत आहेत.
पडद्यामागे असणारे सूत्रधार यांनी त्याआधी महाराष्ट्रातील जनतेचे अजितदादांवरील प्रेम बघावे. सकाळी सहा वाजल्यापासून जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी दादा कार्यरत आहेत. महाराष्ट्रातील जनता तुमच्या अशा षडयंत्राना बळी पडणार नाही. दादांवर सुडबुद्धीतुन केलेल्या या कारवाईचा महाराष्ट्राची जनता निश्चितच विचार करेल.