Monday, July 22, 2024
Homeमहाराष्ट्ररायगड" उरण केगांव व आनंदवाडी नेरळ " गोविंदा पथक ठरले दहीहंडीचे मानकरी...

” उरण केगांव व आनंदवाडी नेरळ ” गोविंदा पथक ठरले दहीहंडीचे मानकरी !

गोविंदा पथकांचा थरार ,नामचीन मान्यवरांची एन्ट्री संगीत ताल तर शिवसेनेचे आमदार महेंद्र शेठ थोरवे व पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत कर्जतमध्ये लाखाची दहीहंडी उत्सव जल्लोषात !

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) ” मित्रांनो थराला या….. नाहीतर धरायला या…….आपलं समजून गोविंदाला या ” असे आवाहन कर्जत – खालापूर मतदार संघाचे ” कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे फाऊंडेशन व शिवसेना कर्जत ” यांनी कर्जतकर नागरिकांना केल्याने उत्तर रायगड जिल्ह्यातून तसेच कर्जत – खालापूर मतदार संघ , बदलापूर ते चेंबूर या उपनगरातून आलेल्या अनेक गोविंदा पथकांच्या चित्त थरारक सात थरांचे उंच मनोरे रचून छोटा ” बाळ कान्हा ” शेवटच्या थराला उभा राहून देत असलेल्या कमालीची सलामी पाहून , नागरिकांना तोंडात बोटे घालायला लावणारे ते दृश्य बघून , टाळ्यांच्या गजरात त्याचे केलेले अभिनंदन व कुणालाही ईजा न होता एक एक करून मनोरे खाली होवून पडणाऱ्या पावसात संगीत तालावर नाद धरून नाचणारे गोविंदा , त्यामुळे कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे फाऊंडेशन व शिवसेना कर्जत शहर कमिटी ने आयोजित केलेल्या या दहीहंडी उत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
यावर्षी दहिहंडी फोडणाऱ्या गोविंदा पथकांना प्रथम पारितोषिक (खुले) रु. १,११,१११/- तर सहा थराच्या सलामीसाठी रु.११,०००/- व सन्मानचिन्ह देण्यात आले.
( फक्त कर्जत तालुक्यासाठी ) प्रथम पारितोषिक रु.३१,९९९/- , पाच थराच्या सलामीसाठी रु. ६,०००/- व सन्मानचिन्ह (फक्त कर्जत साठी ) . असा अतिशय चित्त थरारक हा दहिहंडी उत्सव गुरुवार दिनांक ७ सप्टेंबर २०२३ रोजी सायंकाळी ४ – ०० वाजता , रॉयल गार्डन शेजारील मैदान कर्जतकर नागरिकांच्या जोषपूर्ण गर्दीने साक्षीदार झाला.

यावेळी या दहीहंडी उत्सवात प्रथम शिव साई क्रिडा मंडळ – चेंबूर यांनी सहा थरांची पहिली सलामी देवून सुरुवात झाली. दुसरी सलामी छत्रपती शिवाजी महाराज मंडळ – बेलवली बदलापूर ,न्हावी पाडा – बदलापूर , गोविंदा पथक शिरगाव बदलापूर , ध्रुव गोविंदा पथक – स्टेशन पाडा बदलापूर , पाटील आळी मित्र मंडळ – कर्जत , उसराई गोविंदा पथक रसायनी , जय अंबे भवानी माता गोविंदा पथक – भिसेगाव , त्याचप्रमाणे खोपोली , उरण , नेरळ , तसेच कर्जत तालुक्यातील अनेक गोविंदा पथकांनी हजेरी लावून आकर्षक सलामी देवून पारितोषिक पटकावले . तर यांत पुरुष गोपालांसाठी लक्की ड्रॉ प्रथम पारितोषिक टीव्ही , द्वितीय पारितोषिक सायकल , तृतीय पारितोषिक मोबाईल देण्यात आले.
महाराष्ट्रातील ख्यातनाम व्यक्तिमत्त्व असलेले ” मा. तानाजीभाऊ जाधव ” – अध्यक्ष टायगर ग्रुप महाराष्ट्र , महाराष्ट्र बैलगाडा शर्यतीचे प्रोत्साहनकर्ते तथा अध्यक्ष पंढरी शेठ फडके , हे खास मान्यवर उपस्थित होते , तर सिने अभिनेत्री धनश्री काडगावकर व अंकिता राऊत( एकवीरा आई फेम ) , रितू पाटील , श्रीमान (Pubg किंग) , यांचा गाण्यांचा अनोखा नजराणा , असा बहारदार भारतीय संस्कृती व एकात्मता , संघटन व बंधुता याचे दर्शन घडविणारा दहीहंडी उत्सव ” कार्यसम्राट आमदार महेंद्रशेठ थोरवे फाऊंडेशन व शिवसेना कर्जत शहर ” यांच्या वतीने साजरा झाला . याला कर्जतकर नागरिक , महिलावर्ग , बाल गोपाळ , यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला . या दहीहंडी उत्सवात खुल्या गटात ” केगांव उरण ” या गोविंदा पथकाने 1,11,000/- तर कर्जत तालूका मर्यादित गटात ” आनंदवाडी नेरळ ” या गोविंदा पथकाने चित्त थरारक मानवी मनोरे रचून 31,111/- पारितोषिकाचे मानकरी ठरले.

महाराष्ट्रातील संस्कृती जपण्यासाठी असे कार्यक्रम झाले पाहिजेत व सर्वसामान्य जनतेसाठी लोकप्रतिनिधी या नात्याने सातत्याने प्रयत्न करत राहीन , असे मनोगत आमदार महेंद्रशेठ थोरवे यांनी या कार्यक्रमात व्यक्त केले. या कार्यक्रमास शिसवसेनेचे जिल्हा प्रमुख संतोष शेठ भोईर , उपजिल्हा प्रमुख भाई गायकर , मा. उपसभापती मनोहर दादा थोरवे , युवा सेना जिल्हा सचिव संदीप शेठ भोईर , नगरसेवक संकेत भासे , कर्जत शहर प्रमुख अभिषेक सुर्वे , संघटक नदीम भाई खान, मोहन भोईर , सचिन खंडागळे , दशरथ मुने , उपशहर प्रमुख दिनेश कडू ,राकेश दळवी , मोधळे, आसवले , शिंदे , पंकज पवार , तसेच अनेक महिला आघाडी , युवा सेना पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक रसिक प्रेक्षक उपास्थित होते.
- Advertisment -

You cannot copy content of this page