उर्से टोल नाका येथून ट्रक चालकांना लुटणारी टोळी गजाआड..शिरगांव पोलिसांची कामगिरी !

0
119

वडगाव मावळ : उर्से टोल नाका हद्दीत ट्रक चालकांवर दरोडा टाकणाऱ्या टोळीला शिरगाव- परंदवडी पोलिसांनी मंगळवार दि.7 रोजी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास उर्से टोल नाका येथून मोठ्या शिताफीने अटक केली आहे .

संकेत सर्जेराव कांबळे ( वय 21 , रा . पनवेल जि . रायगड ) , अमोल संभाजी गोपाळे ( वय 26 , रा . शिरगाव ता . मावळ ) , अक्षय राजू शेळके ( वय 26 , रा . शिंदे वस्ती सोमाटणे फाटा ) , प्रकाश श्रीरंग साळुंखे ( वय 23 रा . चौराई नगर , सोमाटणे फाटा ) , प्रिन्स लालजी यादव ( वय 21 , रा . चौराई नगर सोमाटणे फाटा ) , प्रसाद ज्ञानेश्वर कानगुडे ( वय 19 , रा . काकडे वस्ती सोमटणे ) व राजा गंगाधर बाग ( वय 21 , रा . गणेश नगर , सोमाटणे फाटा ) अशी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत .

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील उर्से टोलनाक्या जवळ थांबणाऱ्या ट्रक चालकांवर दरोडा टाकून त्यांना मारहाण करून त्यांच्या ताब्यातील पैसे मोबाईल चोरणाऱ्यांची टोळी सक्रिय झाली होती . ही टोळी दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक वनिता धुमाळ , सहाय्यक पोलीस निरीक्षक उद्धव खाडे , पोलीस हवलदार तुकाराम साबळे , पोलीस नाईक समीर घाडगे , पोलीस नाईक योगेश नागरगोजे , समाधान फडतरे आदींनी त्या परिसरात सापळा रचला असता सदर ठिकाणी अनोळखी 7 जण दरोडा टाकण्याच्या तयारीत आले होते . त्यांची चौकशी केली असता अंधाराचा फायदा घेऊन पळून जात असताना , पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदारांनी मोठ्या शिताफीने 7 दरोडेखोरांना अटक केली आहे. अटक आरोपींना बुधवार दि.8 रोजी दुपारी वडगाव मावळ न्यायालयात हजर केले असता , न्यायालयाने त्यांना मंगळवार दि.14 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.