ऊर्जा क्षेत्रात मुंबई ऊर्जा मार्ग संस्था तरुणांना रोजगार व कौशल्य विकास प्रशिक्षण देणार !

0
29

नेरळ – कशेळे मार्गावर प्रोजेक्ट्चे निनाद पितळे यांच्या हस्ते उदघाटन…

भिसेगाव- कर्जत(सुभाष सोनावणे) ग्रामीण भागातील तरुणांना रोजगारासाठी सुसज्ज करण्यास ऊर्जा प्रशिक्षण देऊन त्यांना स्वताच्या पायावर उभे करून ” मुंबई ऊर्जा मार्ग ” या संस्थेच्या माध्यमातून त्यांच्या अंगी असलेले कौशल्य , आत्मविश्वास जागृत करून सक्षम करण्याचे व त्यांची स्वप्ने साकार करण्यासाठी नवीन संधी उपलब्ध करुन देणार असल्याचे भाकीत आज मुंबई उपनगरापासून जवळच असलेल्या रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात नेरळ – कशेळे मार्गावर मुंबई ऊर्जा मार्ग सिमेंस ऐक्य एज्युकेशन आणि वेल्फेअर ट्रस्ट करिअर टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने बेसिक इलेक्ट्रिशियन कोर्सचा उदघाटन सोहळा मुंबई ऊर्जा मार्ग प्रकल्प संचालक निनाद पितळे यांचे शुभहस्ते नुकतेच झाले , त्याप्रसंगी ते बोलत होते.” मुंबई ऊर्जा मार्ग ” हा ऊर्जा मंत्रालयाने आखलेला अंतर राज्य पारेषण यंत्रणा प्रकल्प आहे .त्याची रचना मुंबई महानगर प्रदेशासाठी विश्वासार्ह परवडणाऱ्या दरातील आणि हरित ऊर्जेचा निर्मितीच्या उद्दिष्टाने केली गेली आहे .या फीड च्या माध्यमातून २००० मेगाव्याट पेक्षा अधिक ऊर्जा वाहून नेण्याची क्षमता असेल तसेच हा प्रकल्प वाढत्या ऊर्जा मागणीची पूर्तता करण्यासाठी असणार आहे .

त्याचबरोबर ग्रामीण भागातील तरुणांना इलेक्ट्रिक प्रशिक्षणाचे ज्ञान व यातील सिद्धांत तसेच अनुभवाची संधी उपलब्ध करून देणार असल्याची माहिती प्रकल्प संचालक निनाद पितळे यांनी दिली.आज ग्रामीण भागातील नेहमीच वीज जात आहे , त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे , आज इलेक्ट्रिक प्रशिक्षित तरुण कुठेच मिळत नाहीत , म्हणून ऊर्जा शिक्षण घेऊन अनुभवाची संधी आम्ही उपलब्ध करून देणार , यासाठी तरुण वर्गाने हा कोर्स करा , असे आवाहन देखील त्यांनी केले . येथे 400 kva चा प्रोजेक्त तयार करणार असून ” आत्मनिर्भय तरुण ” बनाविण्याचा प्रयत्न या संस्थेमार्फत करणार असल्याचे निनाद पितळे यांनी सांगितले .

तर गणेश भोपी सर यांनी गरीब – गरजू विद्यार्थ्यांना येथे इलेक्ट्रिक स्किल शिकवून रोजगार देणार , २० दिवसांची बॅच सुरू केली आहे यांत २०० हुन अधिक तरुणांना टप्प्याटप्प्याने प्रशिक्षण देणार असल्याचे सांगितले . यासाठी निहारिक फाउंडेशन संचालित करिअर टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट , नेरळ – कशेळे रोड , सुप्रिया हॉटेल जवळ , नेरळ ( प .) संपर्क – भोपी सर – 9767013076 येथे संपर्क करण्याचे आवाहन कर्जत तालुक्यातील तरुणांना केले आहे.यावेळी नेरळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच मंगेश म्हसकर , राजेश भगत , कराळे सर ,मुंबई ऊर्जा मार्ग चे चीफ प्रोजेक्ट ऑफिसर अरुण शर्मा ,त्याचबरोबर मुंबई ऊर्जा मार्ग चे निनाद पितळे, प्रकल्प संचालक- मुंबई ऊर्जा मार्ग यांच्या उपस्थितीत झाले. राजेश शर्मा- सचिव आणि कोषाध्यक्ष, भाजप कल्याण बदलापूर प्रदेश; श्री अविनाश भोपी, नगरसेवक- कुळगाव बदलापूर नगर परिषद; श्री अशोक राणे, अध्यक्ष- सीमेन्स ऐक्य एज्युकेशन अँड वेलफेअर ट्रस्ट; श्री गिरीश अष्टेकर, सचिव- सीमेन्स ऐक्य एज्युकेशन अँड वेलफेअर ट्रस्ट आणि प्रख्यात सामाजिक कार्यकर्ते, श्री हरेश धुळे आदि मान्यवर उपस्थित होते.