Monday, March 27, 2023
Homeमहाराष्ट्ररायगडएकच मिशन , गुंडगे प्रभागात शंभर टक्के लसीकरण !

एकच मिशन , गुंडगे प्रभागात शंभर टक्के लसीकरण !

नगरसेवक उमेश आप्पा गायकवाड यांच्या वतीने कोरोना लसीकरण शिबिर संपन्न..

भिसेगाव-कर्जत(सुभाष सोनावणे)
कर्जत नगर परिषद हद्दीत प्रभाग क्रमांक ९ गुंडगे येथे रहात असलेल्या कामगार , आदिवासी बांधव , त्याचप्रमाणे इतर नागरिकांना कोरोना संसर्ग महामारीपासून सुरक्षितता मिळावी यासाठी कवचकुंडले रुपी लस देऊन आपल्या प्रभागात शंभर टक्के लसीकरण होणे , हे एकच मिशन पूर्ण करण्याच्या उद्देशाने गुंडगे प्रभागाचे नगरसेवक उमेशआप्पा श्रीरंग गायकवाड यांच्या वतीने आज गुंडगे येथे गुड शेफर्ड जुन्या शाळेत कोविड – १९ लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.कर्जत नगरपरिषद व उपजिल्हा रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने कोविड – १९ लसीकरण मोहीम राबवून गुंडगे प्रभाग कोरोना मुक्त करण्याच्या उद्देशाने आज रविवार दिनांक १९ सप्टेंबर २०२१ रोजी, सकाळी ९ वा . गुंडगे प्रभाग क्र. ९ मधील नागरिकांसाठी लसीकरण नगरसेवक उमेश आप्पा गायकवाड यांच्या वतीने करण्यात आले.

यावेळी कोव्याक्सीन दुसरा डोस तसेच कोव्हीशिल्डचा पहिला व दुसरा डोस उपलब्ध होता . जुने गुड शेफर्ड स्कूल , गजानन अपार्टमेंट समोर , गुंडगे येथे एकूण ३२६ नागरिक , महिला यांनी लस घेतली. यावेळी उपजिल्हा रुग्णालयाच्या वतीने डॉ .संगीता दळवी व त्यांची टिम , सुमंतु हॉस्पिटलचे डॉ.सुनील ढवळे , डॉ.ईश्वरी ढवळे , नेरळ येथील डॉ .सागर काटे यांनी सहकार्य केले . या लसीकरण शिबिरास कर्जत नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ.सुवर्णा केतन जोशी , माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस कर्जत शहर कार्याध्यक्ष राजेशदादा लाड यांनी भेट दिली .या शिबिरास नगरसेवक उमेश आप्पा गायकवाड मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली.

You cannot copy content of this page