एकविरा गडावर दुचाकी चोरट्याला लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून अटक..

0
448

लोणावळा : एकविरा गडातील पार्किंग मधून दुचाकी पळवीणाऱ्या चोरट्याला लोणावळा ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

याबाबत सुनील कचरू मुळीक ( रा. पेठ, परगाव, ता. आंबेगाव, जि. पुणे, सध्या रा.औंढे, ता. मावळ, जि. पुणे ) याला अटक करण्यात आली आहे.

लोणावळा ग्रामीण पोलीसांनी दिलेल्या माहिती नुसार दि.3/5/2022 रोजी कार्ला एकविरा गडावरून फिर्यादी संतोष देशमुख (रा. देवघर, ता. मावळ, जि. पुणे ) याची दुचाकी क्र. MH 14 BL 1295 ही चोरीस गेल्याची फिर्याद लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये दिली होती. दिलेल्या फिर्यादीवरून लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये गु. र. नं.78/2022, भा. द. वी. कलम 379 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास करत असताना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार सहाय्यक पोलीस अधीक्षक राजेंद्र पाटील, पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून पुण्यातील एक दुचाकी जप्त करण्यात आली आहे. आरोपीला वडगाव न्यायालयात हजर केले असता त्यास दोन दिवसाची पोलीस कस्टडी देण्यात आली आहे.

सदर बाबत सहाय्यक पोलीस अधीक्षक राजेंद्र पाटील, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण मोरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कुतूबुद्दीन खान, पोलीस हेड कॉन्स्टेबल शकील शेख, पोलीस नाईक शरद जाधवर, कॉन्स्टेबल तळपे यांनी सदरची उल्लेखनीय कामगिरी केली आहे.