एकविरा ग्रुप खोपोली यांच्या वतीने पूरग्रस्तांना धान्य वाटप…

0
38

खोपोली (दत्तात्रय शेडगे)
कोकणात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असून काही भागात अतिवृष्टीमुले अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत.

तर खोपोलितील नदीकाठच्या गावांनाही जोरदार फटका बसला आहे याची दखल घेत खोपोली समता नगर येथील नागरिकांना जीवनावश्यक वस्तू वाटप करण्यात आल्या.

एकविरा ग्रुप खोपोली याच्या वतीने नेहमी गरीब गरजूना मदत करण्यात येते त्याचप्रमाणे सामाजिक बांधीलकी जपत एक हात मदतीचा देत खोपोली येथील नदी काठाच्या समता नगर येथील 30 कुटूंबाना हे धान्य वाटप करण्यात आले.

यावेळी एकविरा ग्रुप खोपोलीचे अध्यक्ष अक्षय सकपाळ, उपाध्यक्ष विनायक साळुंखे, समाज सेविका कांचन जाधव, संदेश माने आदित्य पाटील आदी उपस्थित होते.