Friday, June 9, 2023
Homeपुणेलोणावळाएकविरा देवी यात्रेत आय पी एस सत्यसाई कार्तिक यांची मोठी कारवाई ,36...

एकविरा देवी यात्रेत आय पी एस सत्यसाई कार्तिक यांची मोठी कारवाई ,36 हजाराचा दारू साठा जप्त…

लोणावळा : लोणावळा उप विभागाचे सहाय्यक पोलीस अधिक्षक सत्यसाई कार्तिक यांनी श्री एकविरा देवी चैत्री उत्सवादरम्यान अवैध दारुविक्री व्यावसायीकांवर धडाकेबाज कारवाई करत 36,720/- रुपयांच्या विदेशी दारुच्या बाटल्यांसह 3 जणांना ताब्यात घेण्यात आले.
लोणावळा उप विभागाचे सहाय्यक पोलीस अधिक्षक सत्यसाई कार्तिक यांना स्वतः गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, श्री. एकविरा देवी चैत्री उत्सवादरम्यान काही इसम हे त्यांचेकडे बेकायदा बिगर परवाना विदेशी दारुचा साठा जवळ बाळगून ते विक्री करीत आहेत. अशी माहिती मिळाल्याने लोणावळा विभागाचे सहायक पोलीस अधिक्षक कार्तिक यांनी स्वतः पथकासह व स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण यांचेकडील स्टाफ असे समांतर 28 मार्च रोजी वेहेरगाव येथे पायी पेट्रोलींग करीत असताना भुषण विनायक पडवळ, केशव नारायण चौधरी, नवनीत कोरागा खंबाडी सर्व रा. वेहेरगाव ता. मावळ जि. पुणे यांच्या ताब्यात विदेशी दारुचा साठा असा एकुण 36,720/- रुपयांच्या मुददेमालासह मिळुन आले आहेत.
सदर इसमांना मुददेमालासह ताब्यात घेवुन मुददेमाल जप्त करण्यात आला आहे. सदरबाबत मारुती बारकु गोफणे सहायक पोलीस उपनिरीक्षक नेमणुक उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय लोणावळा विभाग यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

You cannot copy content of this page