Sunday, June 23, 2024
Homeपुणेमावळएकविरा विद्या मंदिर कार्ला विद्यालयात संविधान दिन उत्सहात साजरा…

एकविरा विद्या मंदिर कार्ला विद्यालयात संविधान दिन उत्सहात साजरा…

कार्ला (प्रतिनिधी):एकविरा विद्या मंदिर कार्ला येथे संविधान दिनानिमित्त माजी विद्यार्थ्यांतर्फे डॉ.बाबासाहेब आंबेडकर व संत तुकाराम महाराज यांविषयी श्री विठ्ठल काळोखे देहू यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
संविधान दिन किंवा राष्ट्रीय विधी दिन हा 26 नोव्हेंबर रोजी भारत भर साजरा केला जातो .29 ऑगस्ट 1947 रोजी डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संविधानाच्या निर्मितीस मसूदा समिती स्थापन झाली . अनेक बैठका व चर्चासत्रांनंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेने स्वीकारला . त्यामुळे 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो .
यावेळी सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी, सर्व शिक्षक वर्ग, सेवक वर्ग आणि पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सामुहिक संविधान वाचन करून संविधान दिन साजरा केला.यावेळी एकविरा विद्या मंदिर शाळेचे प्राचार्य पारखी सर, उमेश इंगुळकर, संतोष हुलावळे, बाबाजी हुलावळे यांसह शाळेतील इतर शिक्षक व शिक्षिका तसेच शाळेचे माजी विद्यार्थी अमोल भेगडे, किसन येवले, नवनाथ कोंडभर, कैलास भानुसघरे, ह भ प अनिता महाराज मोरे इत्यादी कार्यकर्ते व विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
- Advertisment -

You cannot copy content of this page