Sunday, July 14, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडएकसळ गावातील रस्ताची दुरवस्था… स्थनिक नागरिकांची नाराजी..

एकसळ गावातील रस्ताची दुरवस्था… स्थनिक नागरिकांची नाराजी..

कर्जत, दि.3 प्रतिनिधी

कर्जततालुक्यातील चिंचवली ग्रामपंचायत हद्दीतील चिंचवली गावातून जाणारा एकसळ गावामधील हा मुख्य रस्ता संपूर्ण रस्ताची दुरवस्था झाली आहे.

एकसळ गावामधील हा रस्ता दळण वळणचा रस्ता आहे. यापरिसरतील रस्ता नक्की रस्ता आहे की,खड्यात रस्ता की,रस्त्यात खड्डा अशी रस्ताची दुरवस्था झाली आहे, अक्षरशः संपूर्ण रस्ताची चाळण झाली असून या रस्त्यावरून चाकरमानी आणि दुधावले आणि शाळातील मुले,मुली आणि महिला वर्ग आणि नागरिक ये जा करत असतात.याप्रसंगी चिंचवली गाव ते एकसळ पर्यंत मोठी कसरत करावी लागत असते.

या रस्ता कडे लोकप्रतिनिधीच दुर्लक्ष का ? असे प्रश्न स्थानिक नागरिकांना पडला आहे, एकसळ गावातील रस्ताचा वनवास कधी संपणार ? सदर प्रशासने या रस्ताची लवकरात लवकर दुरुस्ती करणयात यावी,अशी मागणी एकसळ गावात मधील नागरिक मागणी करीत आहे.

- Advertisment -

You cannot copy content of this page