Wednesday, May 29, 2024
Homeपुणेतळेगावएकाला मारहाण करून 8 हजार रुपये हिसकावून नेल्या प्रकरणी तळेगाव पोलिसांनी तींघांना...

एकाला मारहाण करून 8 हजार रुपये हिसकावून नेल्या प्रकरणी तळेगाव पोलिसांनी तींघांना ठोकल्या बेडया….

मावळ (प्रतिनिधी) : तळेगाव दाभाडे येथे एकाला मारहाण करत आठ हजार रुपये हिसकावल्या प्रकरणी तीन 20 ते 22 वर्षीय युवकांना तळेगाव पोलिसांनी अटक केली आहे.सदर घटना ही मंगळवार दि.12 रोजी पहाटे 2:30 वा.च्या चाकण रोड, तळेगाव दाभाडे येथील ऐश्वर्या हॉटेल येथे घडली.
याबाबत रवींद्र चंद्रभान यादव ( वय 29, ड्रायवर, रा. संतोष ट्रान्सपोर्ट कंपनी, कातवी, ता. मावळ ) यांनी तळेगाव दाभाडे पोलिसांत फिर्याद दिली असून याप्रकरणी हेमंत बाळू धोत्रे (वय 20, रा. सिध्दार्थनगर, तळेगाव दाभाडे), सुमित राकेश गलीयल (वय 20, रा. सिध्दार्थनगर, तळेगाव), अनिकेत दादाभाऊ धायभर ( वय 22, रा. अंबिका पार्क, वतननगर, तळेगाव दाभाडे ता. मावळ, जि . पुणे) यांना अटक करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तळेगाव दाभाडे हद्दीतील चाकण रोडवरील ऐश्वर्या हॉटेलजवळ आरोपी धोत्रे, गलीयल, धायभर या तिघांनी मिळून फिर्यादी यादव यांना हाताबुक्यांनी मारहाण केली. तसेच फिर्यादीच्या ताब्यातील रोख रक्कम आठ हजार रुपये जबरदस्तीने हिसकावून नेले. पुढील तपास तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक इंगळे हे करत आहेत.
- Advertisment -

You cannot copy content of this page