बोरघाटात ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने ट्रक पलटी, ट्रक मध्ये अडकून एकाच जागीच मृत्यू तर दोन जण जखमी..
मुबंई पुणे एक्सप्रेस वेवर अपघाताची मालिका सतत सुरू असून आज सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास बोरघाटात अंडा पॉईंट जवळ तीव्र उतारावर ट्रक चा फेल झाल्याने ट्रक समोरील डोंगराला जाऊन आदळून भीषण अपघात झाला.
या अपघातात ट्रक मधील दोघांनी उड्या मारल्याने ते जखमी झाले तर एक जण अडकल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला पुण्याहून मुबंई कडे बोरघाटातुन नो एंट्री मार्गे खोपोली कडे ट्रक क्रमांक (एम एच २८ एबी ७१५६ ) जात असताना दस्तूरी अंडा पॉइंट जवळील तीव्र उतारावर ब्रेक फेल होऊन चालकाचे त्यावरील नियंत्रण सुटून ट्रक समोरील डोंगराला धडकून भीषण अपघात झाला.
या ट्रक मध्ये एकूण तीन जण होते त्यातील दोन जणांनी उड्या मारल्याने ते जखमी झाले मात्र एक जण ट्रक मध्ये अडकल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.आज सकाळ पासून हा दुसरा अपघात असून आज सकाळी एक्सप्रेस वेवर ट्रक चा अपघात होऊन त्याखाली चेंगरुंग एक जनाचा जागीच मृत्यू झाला होता.