Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडएक्सप्रेस हायवे वर ढेकू गावाजवळ भीषण अपघात...एक जण गंभीर

एक्सप्रेस हायवे वर ढेकू गावाजवळ भीषण अपघात…एक जण गंभीर

(प्रतिनिधी दत्तात्रय शेडगे)
खालापूर दि.18:मुबंई पुणे एक्सप्रेस वेवर सतत अपघाताची मालिका सुरू असून आज पहाटे पाच वाजण्याच्या दरम्यान एक्सप्रेस वेवर ढेकू गावाजवळ एका आयसर टेम्पो ने समोरील अज्ञात वाहनाला जोरदार धडक देऊन भीषण अपघात झाला याला अपघातात एक जण गंभीर जखमी झाला आहे.


पुण्याहून मुबंई कडे माल घेऊ आयसर टेम्पो जात असताना तो एक्सप्रेस वेवरील ढेकू गावाजवळ असता चालकाचे टेम्पो वरील नियंत्रण सुटल्याने त्याने समोरील अज्ञात वाहनाला जोरदार धडक दिली समोरील वाहन निघून गेले मात्र यात टेम्पो मध्ये चालक अडकला असून टेम्पोचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, याची माहिती बोरघाट महामार्ग पोलीस, अपघात रेस्क्यू टीमच्या सदस्यांना मिळताच ते तात्काळ घटनास्थळी दाखल होत अडकलेल्या चालकाला बाहेर काढुन त्याला पुढील उपचारासाठी एमजीएम येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

- Advertisment -

You cannot copy content of this page