Sunday, December 22, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडएक हात औषधांच्या मदतीचा,कर्जत महिला आघाडी भाजपच्या वतीने गोरगरिबांना मोफत औषध वाटप..

एक हात औषधांच्या मदतीचा,कर्जत महिला आघाडी भाजपच्या वतीने गोरगरिबांना मोफत औषध वाटप..

भिसेगाव- कर्जत/सुभाष सोनावणे-

भारतीय जनता पार्टी कर्जत महिला आघाडीच्या वतीने उपजिल्हा रुग्णालय कर्जत येथे गोरगरीबांसाठी मोफत औषधे देण्यातआली.

आज रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या गोरगरीब जनतेला विविध समस्यांवर उपयोगी पडतील अशी अनेक प्रकारची औषधे तसेच डॉक्टरांना कोविड परिस्थितीत लागणारी सुरक्षा किट म्हणजेच पी पी इ किट , मास्क , फेस शिल्ड देण्यात आले .खोकला – कान – डोळे तसेच जखमेवर लावण्यात येणारे मलम अशी औषधें देण्यात आली.


याप्रसंगी कर्जत महिला आघाडीच्या तालुका अध्यक्षा स्नेहा गोगटे , नगरसेविका स्वामिनी मांजरे , मनीषाताई धुमणे , किसान मोर्चा कोकण संघटक सुनिल गोगटे , नगरसेवक तथा पाणी पुरवठा सभापती बळवंत घुमरे , विजय जिनगरे , डॉक्टर सुप्रिया घोसाळकर , उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक बनसोडे , सर्वेश गोगटे आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते . याप्रसंगी अधीक्षक बनसोडे यांनी रुग्णालयात औषधे दिल्याने गोरगरीब आदिवासी जनतेस त्याचा फायदा होईल , महिला आघाडी भाजपच्या या उपक्रमाचे कौतुक केले आणि विविध समस्या बाबत आम्हास सहकार्य करावे असे सांगितले.

- Advertisment -

You cannot copy content of this page