(खोपोली- दत्तात्रय शेडगे)
महाराष्ट्र सुरक्षा बल कमांडो यांत कार्यरत असलेले आणि देशाची सेवा अविरत पणे करणारे जवान विवेकानंद अनिल योगे यांचा वाढदिवस नुकताच शिंग्रोबा उत्सव कमिटीच्या वतीने साजरा करण्यात आले.मुबंई पुणे एक्सप्रेस वेवर खासदार जावेद अक्तर यांच्या गाडीला अपघात झाला होता.
या गाडीत जावेद अक्तर यांची पत्नी शबाना आझमी व कमांडो यांची गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती त्याच वेळी तेथे तैनात असलेले कमांडो विवेकानंद योगे यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता अपघात ग्रस्त गाडीतून जावेद अक्तर यांच्या कुटुंबाना बाहेर काढून त्यांना तात्काळ हॉस्पिटलमध्ये पाठवून जीव वाचवला,या घटनेमुळे योगे यांचा विविध क्षेत्रातून पुरस्कार आणि सन्मान झाला आहे.
असा या महान एमएसएफ बल क्षेत्रात कार्यरत असलेले कमांडो विवेकानंद अनिल योगे यांचा शिंग्रोबा उत्सव कमिटीच्या वतीने वाढदिवस साजरा करण्यात आला.यावेळी शिंग्रोबा उत्सव कमिटीचे संस्थापक तथा धनगर समाजाचे नेते बबन शेडगे,माजी अध्यक्ष दीपक आखाडे आतकरगाव ग्रामपंचायतचे सदस्य दत्ताभाऊ शेडगे, एकनाथ घाटे, नारायण हिरवे ,बाळू आखाडे आदी उपस्थित होते