

(खोपोली-दत्तात्रय शेडगे)
देशात कोरोना महामारीचे मोठे संकट असून दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्याही वाढत आहे, पनवेल तालुक्यातील कळंबोली येथे असलेल्या एमजीएम हॉस्पिटलमध्ये मध्ये कोरोना सेंटर सुरू केले असून येथे अनेक कोरोना बाधित रुग्ण आहेत, तर त्या कोरोना बाधित पेसेंट सोबत त्याचे काही नातेवाईकही आहेत.
मात्र त्यांना त्या ठिकाणी जेवणाची सोय नाही याची दखल घेत सामाजिक कार्यकर्ते व ऑल इंडिया धनगर महासंघाचे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख आनंदराव कचरे आणि मित्र परिवार यांनी सामाजिक बांधिलकी जपत सलग 21 दिवस नाष्टा आणि चहा ची सोय करून अन्नदान केले.
या रुग्णालयात कोरोना व्यतिरिक्त अनेक गोरगरीब रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक असून या ठिकाणी जेवण आणि रहाण्याची सोय नाही याची दखल घेत सामाजिक कार्यकर्ते आनंदराव कचरे आणि मित्र परिवार यांनी एकत्र येत एक हात माहितीचा देत येथे सलग 21 दिवस येथिल रुग्ण आणि नातेवाइकाना नाष्टा आणि चहा ची सोय केली.यावेळी दत्ता कोळेकर, सचिन कदम , ऑल इंडिया धनगर महासंघाचे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख आनंदराव कचरे यांनी हा उपक्रम राबविला ,या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहेत.