लोणावळा : लोणावळ्यातील वर्धमान सोसायटीमधील गुरुकृपा डिस्ट्रिब्युटर येथे छापा मारून पुणे ग्रामीणच्या एलसीबी पथकाने एकास अटक करून दोन गावठी पिस्टल, एक जिवंत काडतूस, एक लोखंडी कोयता व एक रेम्बो चाकू असा एकूण 1, 00, 900 कीं. शस्त्र साठा हस्तगत केला आहे. सदर घटनेने शहरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये तर्क वितर्क सुरु आहेत.
लोणावळा शहर पोलीस स्टेशनकडून मिळालेल्या माहितीनुसार सुरज विजय अगरवाल ( वय 40, रा. कल्पतरू हॉस्पिटल समोर, वर्धमान सोसायटी, लोणावळा ) याला एकूण 1, 00, 900 रु. कीं. च्या शस्त्र साठ्यासह अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडे चौकशी केली असता कादर नजीर इनामदार व मोबीन नजीर इनामदार ( रा. कुसगाव, लोणावळा, ता. मावळ, जि. पुणे ) यांच्या संगनमताने हा शस्त्र साठा केला असल्याचे समोर आले आहे.
त्यासंदर्भात अक्षय अजित नवले ( पोलीस कॉ. ) यांनी लोणावळा शहर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली असून एस. बी. शिंदे ( स. फौ. ) यांनी गु. र. नं. 482/2020 भारतीय हत्यार कायदा कलम 3(25), 4(25) महाराष्ट्र पोलीस कायदा 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीणचे पद्माकर घनवट ( पो. निरीक्षक ), पृथ्वीराज तारे ( सहा. पो. निरीक्षक ), रामेश्वर धोंडगे ( पो. उप निरीक्षक ), दत्तात्रय जगताप (सहा. पो. उप निरीक्षक ), एस. के. पठाण ( सहा. पो. उप निरीक्षक ), प्रकाश वाघमारे, सुनील जावळे, लियाकत अली मुजावर, सुधीर अहिवळे, अक्षय नवले, प्रसन्नजीत घाडगे, बाळासाहेब खडके, समाधान नाईकनवरे, प्रमोद नवले यांच्या पथकाने ही धडक कारवाई केली असून लोणावळा शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पो. निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पो. निरीक्षक मृगदीप गायकवाड पुढील तपास करत आहेत.