
खोपोली- दत्तात्रय शेडगे
धनगर समाजाच्या न्याय हक्कासाठी लढणारी एल्गार सेना असून या संघटनेच्या खालापूर तालुका अध्यक्ष पदी युवा नेते दत्तात्रय गोरे यांनी नुकतीच निवड करण्यात आली.
धनगर समाजावर होणाऱ्या अडीअडचणी,अन्याय या प्रश्नावर आवाज उठवून धनगर समाजाला न्याय देण्यासाठी ही संघटना राज्यात संस्थापक राजाभाऊ दुर्गे यांच्या नेतृत्वाखाली काम करत असून आहेत खालापूर तालुक्यातील राणसई येथे राहणारे युवक तथा हर हर चांगभले धनगर समाज संघटनेचे खालापूर तालुका सचिव दत्तात्रय गोरे यांची एल्गार सेनेच्या खालापुर तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली, त्यांची निवड होताच सर्वच स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.