खोपोली- दत्तात्रय शेडगे
धनगर समाजाच्या न्याय हक्कासाठी लढणारी एल्गार सेना ही एकमेव संघटना असून या संघटनेच्या रायगड जिल्हाध्यक्ष पदी युवा नेते हरेश ढेबे यांची नुकतीच करण्यात आली.
एल्गार सेनेचे संस्थापक अध्यक्ष राजू दुर्गे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात मोठया प्रमाणात संघटना बांधणी चालू असून कोकणातही मोठ्या प्रमाणात या संघटनेची बांधणी चालू असून धनगर समाजातील तरुण मोठ्या प्रमाणात या संघटनेत येत आहेत.
त्यातच हर हर चांगभले धनगर समाज संस्थेचे खालापूर तालुका अध्यक्ष तथा युवा नेते हरेश ढेबे यांची नुकतीच एल्गार सेना रायगड जिल्हा अध्यक्ष पदी निवड करण्यात आली ,ढेबे यांच्या निवडीमुळे सर्वच स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे
प्रतिक्रिया-
एल्गार सेना या संघटनेची ध्येय धोरणे आम्ही रायगड जिल्ह्यातील तळागाळातील प्रत्येक वाडी वस्तीवर पोहचवून समाजाला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीन
हरेश ढेबे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष- रायगड एल्गार सेना