Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्रएस एस सी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर, राज्याचा निकाल 93.83 टक्के..

एस एस सी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर, राज्याचा निकाल 93.83 टक्के..

महाराष्ट्र: राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल आज, शुक्रवार (दिनांक 2 जून) जाहीर झाला आहे. संपूर्ण राज्याचा निकाल हा 93.83 टक्के इतका लागला आहे. सालाबादप्रमाणे यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारली आहे.
राज्यातील नऊ विभागात ही परीक्षा घेण्यात आली होती, यात कोकण विभागाचा निकाल हा सर्वाधिक 98.11 टक्के इतका लागला आहे. तर, नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी 92.05 टक्के इतका लागला आहे.
यंदाही दहावी परीक्षेत मुलींनीच बाजी मारली असून मुलींच्या उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ही 95.87 टक्के इतकी आहे, तर मुलांची टक्केवारी 92.05 इतकी आहे. शिक्षण मंडळांमार्फत परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण मंडळाच्या वेबसाइटवर दुपारी 1 नंतर उपलब्ध होणार आहेत.
राज्यातील 10,000 शाळांचा निकाल हा शंभर टक्के लागला आहे. तसेच यंदाची विद्यार्थ्यांची गुणवारी ही बेस्ट ऑफ फाईव्ह नुसारच करण्यात आली आहे. तसेच मुलांना पुढील वर्गात जाण्यासाठी एटीकेटीचा (ATKT) मार्ग देखील अवलंबता येणार आहे.
या महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ मार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल mahahsscboard.in आणि mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटवर आज (शुक्रवार, दिनांक 2 जून) दुपारी 1 वाजल्यापासून पाहता येणार आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page