ऐतिहासिक शिरकोली ग्रामपंचायत च्या उपसरपंच पदी कोमल अमृत माने यांनी बिनविरोध निवड..

0
72

वेल्हे प्रतिनिधी .- शिरकोली (ता.वेल्हे ) ग्रामपंचायतीचे उपसरपंच सुनील बोरगे यांनी ठरल्यानुसार राजीनामा देण्यास नकार दिल्याने सर्व सदस्यांनी त्यांच्या विरोधात तहसीलदार शिवाजी शिंदे यांच्या कडे अविश्वास ठराव दाखल केला.
त्याप्रमाणे तहसीलदार शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामपंचायत सदस्यांचे विशेष सभेत 5- 0 ने त्यांच्या विरोधात ठराव एकमताने मंजूर झालेनंतर रिक्त झालेल्या उपसरपंच पदाचे पोट निवडणुकीसाठी विद्यमान सरपंच सुनीता पांडुरंग पासलकर यांच्या अध्यक्षतेखाली दि.11.11.2020 रोजी घेण्यात आलेल्या सभेत उपसरपंच पदासाठी एकमेव कोमल अमृत माने यांचा अर्ज आल्याने त्यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड झाली.
याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य अंकुश पोळेकर, ग्रामपंचायत सदस्य मारुती मरगळे ,ग्रामपंचायत सदस्या शोभा बोरगे ,ग्रामपंचायत सदस्या सिंधू पेढीकर ग्रामसेवक विट्टल घाडगे युवा नेते विराज पासलकर, भाजपा युवा मोर्चा वेल्हे तालुका कार्याध्यक्ष सुनील चंद्रकांत बोरगे, संतोष साळेकर, अमृत माने व ग्रामस्थ उपिस्थत होते. तसेच सर्व गावकऱ्यांनी उपसरपंच सौ माने यांना पुढील कार्यकिर्दीस शुभेच्छा दिल्या.