Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडऐनघर ग्रामपंचायतच्या सरपंचपदी शिवसेनेच्या कलावती कोकळे तर उपसरपंचपदी मनोहर सुटे यांची बिनविरोध...

ऐनघर ग्रामपंचायतच्या सरपंचपदी शिवसेनेच्या कलावती कोकळे तर उपसरपंचपदी मनोहर सुटे यांची बिनविरोध निवड…


पाहिल्यादांचं सुकेळी धनगरवाडीला मिळाला सरपंचपदाचा मान…

खोपोली- दत्तात्रय शेडगे

रोहा तालुक्यात श्रीमंत म्हणून ओळखली जाणारी नागोठणे विभागातील ऐनघर ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना आणि भाजप ची एकहाती सत्ता येत शिवसेनेचे ११सदस्य तर भाजपचे ४ सदस्य निवडून येत ग्रामपंचायत वर एकहाती सत्ता मिळवली आहे.

सरपंच आणि उपसरपंच पदाची निवडणूक आज पार पडली यावेळी सरपंचपद इतर मागासवर्गीय प्रवर्गातील महिलेसाठी राखीव असल्याने सरपंचपदी शिवसेनेच्या कलावती राजेंद्र कोकळे व उपसरपंचपदी शिवसेनेचे मनोहर सुटे यांची बिनविरोध निवड करण्यात आल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी अशोक महामुनी यांनी जाहीर केले.

यावेळी सहाय्यक म्हणून ग्रामसेवक दिपक चिपळूणकर यांनी काम पहिले,ऐनघर ग्रामपंचायत निवडणुकीच्या इतिहासात पहिल्यांदाच सुकेळी धनगरवाडीतील दोन उमेदवारांना निवडणूक लढण्याची संधी दिली गेली आणि या निवडणुकीत दोन्ही महिला उमेदवार विजयी झाल्या व त्यातील कलावती राजेंद्र कोकळे यांना सरपंच पदाचा मान मिळाला असून यामुळे सुकेळी धनगर वाडीसह धनगर समाजात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.


यावेळी शिवसेना नेते राजिप सदस्य किशोर जैन, रोहा पं. स. सदस्य संजय भोसले, युवासेना जिल्हाप्रमुख सुधीर ढाणे, नवनिर्वाचीत ग्रामपंचायत सदस्य सविता धामनसे,धनगर समाजाचे नेते भास्कर बावदाणेेेे,नकीबाई कोकळे, भगवान शिद, रोहिदास लाड, अर्चना भोसले, सुषमा वाघमारे, विनोद निरगुडे, प्रकाश डोबले, कल्याणी मोहिते, किशोर नावले, प्रगती भोईर, सुवर्णा शिद, वैदही इंदूरकर, ग्रामस्थ राम तेलंगे, राजेंद्र कोकळे, नामदेव वाघमारे, संतोष लाड, जितेंद्र धामणसे, जगन कोकळे, सचिन भोसले, जनार्दन कोकळे, अनंत ठमके, मंगेश शिरसे, ज्ञानेश्वर जवके, कमलाकर सुटे, प्रदिप मोहिते, लक्ष्मण मोहिते, ओमी मोदी आदींसह कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

- Advertisment -

You cannot copy content of this page