Sunday, April 2, 2023
Homeमहाराष्ट्ररायगडऐन गणेशोत्सवाच्या काळात आसल ग्रामपंचायत हद्दीतील बत्ती गुल....

ऐन गणेशोत्सवाच्या काळात आसल ग्रामपंचायत हद्दीतील बत्ती गुल….

ऐन गणेशोत्सवाच्या काळात आसल ग्रामपंचायत हद्दीत अंधारमय वातावरण…. विद्युत पोलवरील दिवे दुरुस्त करावेत नागरिकांची मागणी..

कर्जत:प्रतिनिधी-गुरूनाथ नेमाणे

दि.२१.कर्जत तालुक्यातील आसल ग्रुपग्रामपंचायत मध्ये विद्युतपोलवर लावलेले दिवे पूर्ण खराब झाले आहेत .ते दुरुस्तीच्या मार्गावर असून आसल ग्रामपंचयत हद्दीत विविध प्रभाग असून त्यात भुतिवली, आसल,पाडा,वडवली आणि ठाकूर वस्ती असे सात विभाग आहेत.त्यात काही वार्ड मध्ये विद्युत पोलवरील दिवे बंद पडले असून ऐन गणेशोत्सव काळात संपूर्ण परिसर अंधारमय झाला आहे.

गणेशोत्सव सण मोठया आनंदाने भावीक भक्त साजरा करतात.असे पाच ते दहा दिवस गणपती बाप्पा असतात.यावेळी रात्रीच्या वेळी रस्तावरून जात असताना सर्वपूर्ण लख काळोख असतो.अशा वेळी नागरिक रस्त्यावरून जाताना भीती वाटत असते,सदर जेष्ठ नागरिक आणि महिला वर्ग सर्वच वार्ड मधील नागरिक यांची मागणी आहे कि,लवकरात लवकर प्रशासनाने विद्युत पोलवरील दिवे दुरुस्तीकरणासाठी जातीने लक्ष घालून काम मार्गी लावावे अशी नागरिकांची मागणी आहे.

You cannot copy content of this page