ऑल इंडिया धनगर महासंघाच्या मावळ तालुका अध्यक्ष पदी बाबुराव शेडगे..

0
97

खोपोली- दत्तात्रय शेडगे

धनगर समाजाच्या न्याय हक्कांसाठी व समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचारावर आवाज उठवून त्यांना न्याय देणाऱ्या ऑल इंडिया धनगर महासंघासाच्या मावळ तालुका अध्यक्ष पदी बाबुराव तुकाराम शेडगे यांची निवड करण्यात आली.


ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्रवीण काकडे हे गेल्या अनेक वर्षांपासून धनगर समाज एक करून धनगर समाजाला न्याय देऊन समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचार यांना वाचा फोडण्यासाठी अहोरात्र झटत आहेत, धनगर समाजात त्यांनी आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटविला असून त्यांच्या विचारावर प्रेरित महाराष्ट्रातील तरुण वर्ग आज त्यांच्या पाठीमागे ठाम पणे उभा आहे.


तर मावळ तालुक्यातील सांगिसे येथील धनगर समाजाचे तरुण नेतृत्व बाबूराव तुकाराम शेडगे यांची ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्या मावळ तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली, ही निवड संस्थापक अध्यक्ष प्रवीण काकडे यांच्या आदेशानुसार शेडगे यांना नियुक्ती पत्रक देऊन करण्यात आली.


ऑल इंडिया धनगर समाज महासंघ मावळ तालुका अध्यक्ष पदी बाबुराव शेडगे यांची निवड होताच त्यांच्यावर सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहेत, तर संस्थापक अध्यक्ष प्रवीण काकडे यांनी आपल्यावर दिलेली जबाबदारी मी यशस्वी पणे पार पाडून ऑल इंडिया महासंघाची विचारधारा संपूर्ण मावळ तालुक्यात पोहचणार असल्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष बाबुराव शेडगे यांनी सांगितले