ऑल इंडिया धनगर महासंघाच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप..

0
240

प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे यांची प्रमुख उपस्थिती..

खोपोली- दत्तात्रय शेडगे

ऑल इंडिया धनगर महासंघ यांच्या वतीने रायगड जिल्ह्यातील कर्जत, खालापूर,पनवेल तालुक्यातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आली.

कर्जत तालुक्यातील दामखिंडी धनगर वाडा, खालापूर तालुक्यातील वाशिवली धनगर वाडा आणि पनवेल तालुक्यातील सारसाई आपटा धनगर वाडा येथील इयत्ता पाहिली ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.

तर यावेळी शैक्षणिक कला, क्रीडा आणि बारावी, व पदवी प्रदान केलेल्या विद्यार्थ्यांना यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी ऑल इंडिया धनगर महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे, राज्य मीडिया अधिकारी महादेव कारंडे, पश्चिम महाराष्ट्र युवक आघाडी संपर्क प्रमुख तुकाराम कोकरे, रायगड जिल्हा अध्यक्ष रामचंद्र पुकळे, संपर्क प्रमुख आनंदराव कचरे, रायगड जिल्हा युवक अध्यक्ष किशोर झोरे, खालापूर तालुका अध्यक्ष ठकुराम झोरे, पनवेल तालुका प्रमुख लक्ष्मण बावदाणे, पेन तालुका अध्यक्ष राजू आखाडे, पनवेल पेन तालुका संपर्क प्रमुख लक्ष्मण मरगले, पनवेल तालुका संपर्क प्रमुख मधुकर बावदाने, पनवेल तालुका महिला आघाडी अध्यक्षा अर्चना शिंदे, कामोठे शहर अध्यक्षा प्रणाली मॅडम, महाड तालुका महिला अध्यक्षा सुनीता ढेबे ,रायगड जिल्हा मीडिया प्रमुख, पेन तालुका सचिव विजय उघडे, गणेश गोरे, नागेश गोरे, जगन गोरे, संतोष कोकरे, संतोष आखाडे, कर्जत तालुका संघटक विनायक कोकरे,केशव आखाडे, कल्पेश कोकरे, पनवेल तालुका सचिव हरेश बावदाने, पांडुरंग गोरे, धोंडीराम आखाडे, बबन हिरवे,आदीसह अनेक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.