ऑल इंडिया धनगर महासंघाच्या युवक रायगड जिल्हाध्यक्ष पदी किशोर झोरे.

0
70

खोपोली- दत्तात्रय शेडगे

धनगर समाजाच्या न्याय हक्कांसाठी व समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचारावर आवाज उठवून त्यांना न्याय देणाऱ्या ऑल इंडिया धनगर महासंघासाच्या युवक आघाडीच्या रायगड जिल्हाध्यक्ष पदी किशोर धाऊ झोरे यांची निवड झाली.


ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्रवीण काकडे हे गेल्या अनेक वर्षांपासून धनगर समाज एक करून धनगर समाजाला न्याय देऊन समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचार यांना वाचा फोडण्यासाठी अहोरात्र झटत आहेत, धनगर समाजात त्यांनी आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटविला असून त्यांच्या विचारावर प्रेरित महाराष्ट्रातील तरुण वर्ग आज त्यांच्या पाठीमागे ठाम पणे उभा आहे.


तर खालापूर तालुक्यातील वाघेश्वर येथील धनगर समाजाचे तरुण नेतृत्व व बोरगाव ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच किशोर धाऊ झोरे यांची ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्या युवक रायगड जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली, ही निवड संस्थापक अध्यक्ष प्रवीण काकडे यांच्या आदेशानुसार झोरे यांना नियुक्ती पत्रक देऊन करण्यात आली.


ऑल इंडिया धनगर समाज महासंघ युवक रायगड जिल्हाध्यक्ष पदी किशोर झोरे यांची निवड झाल्याने त्यांच्यावर सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहेत, तर संस्थापक अध्यक्ष प्रवीण काकडे यांनी आपल्यावर दिलेली जबाबदारी मी यशस्वी पणे पार पाडून ऑल इंडिया महासंघाची विचारधारा संपूर्ण रायगड जिल्ह्यात पोहचवणार असल्याचे नवनिर्वाचित युवक अध्यक्ष किशोर झोरे यांनी सांगितले.