Sunday, September 24, 2023
Homeमहाराष्ट्ररायगडऑल इंडिया धनगर समाज खालापूर तालुका युवक अध्यक्ष पदी ठकुराम झोरे..

ऑल इंडिया धनगर समाज खालापूर तालुका युवक अध्यक्ष पदी ठकुराम झोरे..

खोपोली- दत्तात्रय शेडगे

ऑल इंडिया धनगर महासंघ युवक आघाडीच्या खालापूर तालुका युवक अध्यक्ष पदी युवा नेते ठकुराम झोरे यांची निवड करण्यात आली.ऑल इंडिया धनगर महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे यांच्या आदेशानुसार ठकुराम झोरे यांची निवड करण्यात आली, ऑल इंडिया धनगर महासंघ ही संघटना संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत असून कोकणातही या संघटनेने जोरदार घौडदौड उभारली असुन संघटना वाढवली आहे.तर या संघटनेमार्फत समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचार, यांना वाचा फोडण्यासाठी नेहमी अग्रेसर असून समाजाच्या पाठीशी खंबीर पणे उभे असते.


त्यामुळे ऑल इंडिया धनगर महासंघ युवक आघाडीच्या खालापूर तालुका युवक अध्यक्ष पदी वावरले ग्रामपंचायतचे सदस्य तथा हर हर चांगभले धनगर समाज संस्था उपाध्यक्ष ठकुराम बळीराम झोरे यांची यांची नियुक्ती करण्यात आली.त्यांची निवड होताच सर्वच स्तरातून त्यांचे अभिनंदन व कौतुक होत आहे.

- Advertisment -