ऑल इंडिया धनगर समाज पनवेल तालुका युवक आघाडी अध्यक्ष पदी लक्ष्मण बावदाणे..

0
15

खोपोली- दत्तात्रय शेडगे

ऑल इंडिया धनगर महासंघ युवक आघाडीच्या पनवेल तालुका अध्यक्ष पदी युवा नेते लक्ष्मण बावदाणे यांची निवड करण्यात आली.ऑल इंडिया धनगर महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे यांच्या आदेशानुसार बावदाणे यांची निवड करण्यात आली.

ऑल इंडिया धनगर महासंघ ही संघटना संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत असून कोकणातही या संघटनेने जोरदार घौडदौड उभारली असुन संघटना वाढवली आहे, तर या संघटनेमार्फत समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचार, यांना वाचा फोडण्यासाठी नेहमी अग्रेसर असून समाजाच्या पाठीशी खंबीर पणे उभे असते


त्यामुळे ऑल इंडिया धनगर महासंघ युवक आघाडीच्या पनवेल तालुका अध्यक्ष पदी सारसई गावचे सुपुत्र, शिवसेना शाखाप्रमुख लक्ष्मण बावदाणे यांची नियुक्ती करण्यात आली,त्यांना आज रायगड मीडिया प्रमुख आनंदराव कचरे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.