ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्या खालापूर तालुका संपर्क प्रमूख पदी संतोष घाटे..

0
81

खोपोली- दत्तात्रय शेडगे

ऑल इंडिया धनगर महासंघाच्या खालापुर तालुका संपर्क प्रमुख पदी संतोष घाटे यांची निवड करण्यात आली.ऑल इंडिया धनगर महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे यांच्या आदेशानुसार रायगड जिल्हा युवक आघाडी अध्यक्ष किशोर झोरे यांनी त्यांची निवड केली , ऑल इंडिया धनगर महासंघ ही संघटना संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत असून कोकणातही या संघटनेने जोरदार संघटना उभारली असुन संघटना वाढवली आहे, तर या संघटनेमार्फत समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचार, यांना वाचा फोडण्यासाठी नेहमी अग्रेसर असून समाजाच्या पाठीशी खंबीर पणे उभे असते.


त्यामुळे ऑल इंडिया धनगर महासंघाच्या खालापूर तालुका संपर्क प्रमुख पदी खडई येथील संतोष घाटे यांची नियुक्ती करण्यात आली, त्यांना ऑल इंडिया धनगर समाज महासंघ रायगड जिल्हा युवक आघाडी अध्यक्ष किशोर झोरे यांनी नियुक्ती पत्रक देऊन नियुक्ती करण्यात आली
संतोष घाटे यांची निवड होताच सर्वच स्तरातून त्यांचे अभिनंदन करून कौतुक होत आहे,