Sunday, April 21, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडऑल इंडिया धनगर समाज महासंघाची बैठक संपन्न..

ऑल इंडिया धनगर समाज महासंघाची बैठक संपन्न..


खोपोली- दत्तात्रय शेडगे

ऑल इंडिया धनगर समाज महासंघ रायगड यांची बैठक नुकतीच पार पडली असून या बैठकीत रायगड जिल्ह्यात समाजावर होणारे अन्याय अत्याचार यांना वाचा फोडून समाजाला न्याय देण्यासाठी प्रयत्न करीत आहेत ही बैठक नुकतीच वाघेश्वर येथे पार पडली.


ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रात ही संघटना जोरदार कार्य करीत असून रायगड जिल्ह्यातही या संघटनेची घौडदौड चालु असून जिल्ह्यातील प्रत्येक समाजाच्या गावात जाऊन त्यांना आपसांत असलेले मतभेट बाजूला ठेवून त्यांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करणे, गोर गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मदत करणे, या विषयावर या बैठकीत चर्चा करण्यात आली आगामी काळात ऑल इंडिया धनगर समाज महासंघ रायगड यांच्या वतीने या विषयावर सखोल चर्चा करून समाजाच्या प्रत्येक वाडीवस्तीवर जाऊन आपण सगळे समाज बांधव एक आहोत याची जाणीव करून देत समाजाला एकसंघ करण्याचा प्रयत्न करणार आहेत.


यावेळी ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख तुकाराम कोकरे , मीडिया प्रमुख महादेव कारंडे ,रायगड जिल्हाध्यक्ष रामचंद्र पुकळे, संपर्क प्रमुख आनंदराव कचरे, युवक जिल्हाध्यक्ष किशोर झोरे खालापूर तालुका अध्यक्ष ठकुराम झोरे, उपाध्यक्ष नारायण हिरवे, संघटक संतोष घाटे, महेश शिंदे, नितीन झोरे गणेश गोरे, बाबू झोरे, पप्पू झोरे सुनील घाटे आदीसह अनेक समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisment -

You cannot copy content of this page