Tuesday, September 26, 2023
Homeमहाराष्ट्ररायगडऑल इंडिया धनगर समाज महासंघाची कार्यकारिणी जाहीर जिल्हाध्यक्षपदी विजय गोरे..

ऑल इंडिया धनगर समाज महासंघाची कार्यकारिणी जाहीर जिल्हाध्यक्षपदी विजय गोरे..

खोपोली- दत्तात्रय शेडगे.


धनगर समाजाच्या न्याय हक्कांसाठी लढणारी ऑल इंडिया धनगर समाज महासंघ एकमेव असून या संघटनेची रत्नागिरी जिल्ह्याची कार्यकारिणी नुकतीच जाहीर झाली आहेे.
ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे यांच्या नेतृत्वाखाली ही संघटना संपूर्ण महाराष्ट्रात काम करत असून या संघटनेचे कार्य कोकणातही मोठ्या प्रमाणात चालू आहे.

प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे यांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरी जिल्ह्याची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून यावेळी ऑल इंडीया धनगर समाज महासंघ रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते विजय महादेव गोरे, उपाध्यक्षपदी रमेश बाबल्या कोकरे, रमेश बयाजी जानकर, सचिवपदी अनंत तुकाराम भोजे, संघटकपदी धाऊ बाबा गोरे, संगमेश्वर तालुका संपर्क प्रमुख पदी मारुती महादेव वरक, रत्नागिरी तालुका अध्यक्षपदी शंकर गोरे, उपाध्यक्षपदी संदीप बाबाजी गोरे, सचिव पदी संजय श्रीमंत माने, सचीव पदी भालचंद्र धोंडू कोकरे, सहसचिवपदी संग्राम दशरथ हाके, गटप्रमुख पदी प्रकाश झिलाजी कोकरे, संघटकपदी प्रिंतेश प्रभाकर आखाडे, संपर्क प्रमुख पदी अभिजित अनंत झोरे तालुका युवक आघाडी अध्यक्ष प्रसाद कोकरे, उपाध्यक्षपदी राजेश हाके संघटकपदी महेश होळकर, सहसचिव पदी संतोष हुलवने, गटप्रमुख पदी सचिन चौघुले संपर्क प्रमुख पदी योगेश शिंदे, , सचिव पदी सचिन चौगुले,

लांजा तालुका अध्यक्ष उमाजी गोरे, उपाध्यक्ष पदी संजय झोरे, लांजा तालुका युवक आघाडी अध्यक्ष जयवंत झोरे, संघटकपदी गणेश लांबोरे, गटप्रमुख पदी आनंद आखाडे, आदींची निवड करण्यात आली.

प्रतिक्रिया- रत्नागिरी जिल्ह्यात प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे यांच्या नेतृत्वाखाली ऑल इंडिया धनगर महासंघाची विचार धारा खेड्यापाड्यात पोहचवून गोर गरीब समाज बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही सर्वोत्तपरी प्रयत्न करणार आहे.
विजय गोरे जिल्हाध्यक्ष- ऑल इंडिया धनगर महासंघ रत्नागिरी.
- Advertisment -