ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्या रायगड जिल्हाध्यक्षपदी आनंदराव कचरे..

0
50

(खालापूर दत्तात्रय शेडगे)
ऑल इंडिया धनगर महासंघाच्या रायगड जिल्हाध्यक्षपदी धनगर समाजाचे नेते आनंदराव कचरे यांची नुकतीच निवड करण्यात आली.


धनगर समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचार, आणि मुलांच्या शिक्षणासाठी नेहमी अग्रेसर असलेला हा ऑल इंडिया धनगर महासंघ असुन याच्या रायगड जिल्हाध्यक्ष पदी आनंदराव कचरे यांची नुकतीच निवड करण्यात आली.

त्यांची निवड ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे यांनी ही नियुक्ती केली आहे, त्यांची निवड होताच सर्वच स्तरातून त्यांचे कौतुक सामाजिक कार्यकर्ते राम शिंदे, दत्तात्रय कोळेकर, सचिन केकान, सचिन कदम, महादेव कारंडे, अर्चना शिंदे, शुभांगी शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या.