130 कुटूंबाना केला जीवनश्यक वस्तूंचा वाटप, सामाजिक बांधिलकी जपत दिला एक हात मदतीचा..
खोपोली(दत्तात्रय शेडगे)
महाड मध्ये झालेल्या पुराच्या नुकसानिमुळे अनेकांचे हाल झाले असून ऑल इंडिया धनगर समाज महासंघ रायगड,पनवेल कळंबोली, आणि खालापूर यांच्या वतीने एक हात मदतीचा देऊन त्यांना जीवनश्यक वस्तू वाटप करण्यात आल्या.
कोकणात मुसळधार पाऊस पडला असून अतिवृष्टी मोठया प्रमाणात झाली आहे, त्यामुळे महाड गाव पुर्ण पाण्याखाली गेले असून काही दिवस या गावात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते मात्र यांत काहीचा संसार उध्वस्त झाल्याने त्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे याची दखल ऑल इंडिया धनगर समाज महासंघ रायगड यांनी घेतली असून तालुक्यातील खरवली, वाकी, बिरवाडी, वरंध, सह्याद्रिवाडी येथील गावात जीवनश्यक वस्तू वाटप करण्यात आल्या एकूण 130 कुटूंबाना ह्या वस्तू वाटप करण्यात आल्या.
यावेळी ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रविण काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला यावेळी मुबंई ऑल इंडिया धनगर समाज महासंघ प्रदेश अध्यक्ष सुभाष येले, राज्य मीडिया प्रमुख महादेव कारंडे, पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख तुकाराम कोकरे ,रायगड जिल्हाध्यक्ष आनंदराव कचरे,युवक आघाडी अध्यक्ष विश्वजित नांगरे पाटील, पनवेल तालुका उपाध्यक्ष दत्तात्रय कोळेकर, खालापूर तालुका संपर्क प्रमुख संतोष घाटे, कळंबोली शहर अध्यक्ष पै तुकाराम कोळेकर कोमल कचरे आदीसह अनेक महासंघाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.