Sunday, December 8, 2024
Homeपुणेमावळऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्या मावळ तालुका उपाध्यक्षपदी वाघू कोकरे..

ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्या मावळ तालुका उपाध्यक्षपदी वाघू कोकरे..

खोपोली- दत्तात्रय शेडगे

ऑल इंडिया धनगर महासंघाच्या मावळ तालुका उपाध्यक्ष पदी युवा नेते वाघू कोकरे यांची निवड करण्यात आली.ऑल इंडिया धनगर महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे यांच्या आदेशानुसार वाघू कोकरे यांची निवड करण्यात आली, ऑल इंडिया धनगर महासंघ ही संघटना संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत असून मावळातही या संघटनेने जोरदार घौडदौड उभारली असुन संघटना वाढवली आहे, तर या संघटनेमार्फत समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचार, यांना वाचा फोडण्यासाठी नेहमी अग्रेसर असून समाजाच्या पाठीशी खंबीर पणे उभे असते.


त्यामुळे ऑल इंडिया धनगर महासंघाच्या मावळ तालुका तालुका उपाध्यक्ष पदी आपटी ग्रामपंचायतचे सदस्य तथा धनगर समाजाचे युवा नेते वाघू कोकरे यांची यांची नियुक्ती करण्यात आली, त्यांना मावळ तालुका अध्यक्ष बाबुराव शेडगे यांच्या हस्ते नियुक्ती पत्रक देण्यात आले.


कोकरे यांची निवड होताच सर्वच स्तरातून त्यांचे अभिनंदन करून कौतुक होत आहे,यावेळी ऑल इंडिया धनगर समाज महासंघ पुणे जिल्हा कार्याध्यक्ष विजय सरक, मावळ तालुका अध्यक्ष बाबुराव शेडगे, युवा नेते भीमा कर्हे, अमोल ठोंबरे, अंनता मरगले, आदी उपस्थित होते.

- Advertisment -

You cannot copy content of this page